नागपूर : देशाचे हृदय असलेल्या मध्यप्रदेशला पून्हा एकदा ‘टायगर स्टेट’चा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे कर्नाटकदेखील मध्यप्रदेशकडून हा दर्जा काढून घेत त्यांना ‘टायगर स्टेट’चा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न करत आहेत. या दोन राज्यांपैकी कोणते राज्य ‘टायगर स्टेट’चा दर्जा मिळवणार, हे चित्र अवघ्या काही वेळातच स्पष्ट होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य प्रदेशात गेल्या दोन वर्षांत ३४ वाघांचा मृत्यू झाला आहे. तर एका दशकात १२१ वाघांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी धक्कादायक आहे. मात्र, या मृत्यूनंतरही मध्य प्रदेशात वाघांची संख्या वाढल्याने पुन्हा एकदा या राज्याला ‘टायगर स्टेट’चा दर्जा मिळू शकतो. २०१८च्या व्याघ्रगणनेत मध्यप्रदेशने ५२६ वाघांसह हा दर्जा मिळवला होता. तर अवघ्या दोन वाघांनी कर्नाटक हा दर्जा मिळवण्यात मागे पडले होते.

हेही वाचा – मागणीनुसार मांसाहार, कुटुंबाशी ‘व्हिडीओ कॉलिंग’ अन्…; गडकरींना धमकवणाऱ्या पुजारीचा कारागृहात वेगळाच थाट!

गेल्या तीन-चार वर्षांत मध्य प्रदेशात वाघांच्या मृत्यूने सरकार तणावात असले तरी ताज्या गणनेत वाघांची संख्या वाढल्याची चिन्हे आहेत. मध्य प्रदेशात वाघांची संख्या ७०० च्याही पुढे गेल्याचे संकेत आहेत. २०२२ च्या गणनेनुसार मध्य प्रदेशात ३४ वाघांचा मृत्यू, तर कर्नाटकात १५ वाघांचा मृत्यू झाला आहे. वाघांच्या मृत्यूनंतरही वाघांच्या संख्येत वाढ होणे हे चांगले लक्षण आहे. वाघांच्या मृत्यूची काही प्रकरणे नोंदवली जात नसली तरी, जे वाघ नैसर्गिकरित्या जंगलात किंवा गुहेत मरतात त्यांची नोंद केली जाते. अहवालानुसार, २०१२ ते जुलै २०२२ दरम्यान बांधवगडमध्ये ६६ आणि कान्हामध्ये ५५ वाघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा – नागपुरात दोन दिवसांत करोनाचे तीन बळी; मृत्यू विश्लेषण समितीची लवकरच बैठक

राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांसह जंगलांमध्ये ७०० हून अधिक प्रौढ वाघांची चिन्हे आढळून आली आहेत. याशिवाय वाघाच्या पिल्लांची संख्याही १९६ असल्याचे आढळून आले आहे. सर्वाधिक वाघ बांधवगडमध्ये असणे अपेक्षित आहे, येथे १५० पेक्षा जास्त वाघ असू शकतात. दुसऱ्या क्रमांकावर कान्हामध्ये १२० वाघांचे पुरावे सापडले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Competion for tiger state in between madhya pradesh and karnataka rgc 76 ssb