नागपूर : लोकसभा निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी गृहशहर आणि स्वग्राम असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. तरीही गृहशहर असलेले सायबर क्राईम व आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांची बदली झालेली नाही, त्यामुळे बहुजन वंचित आघाडीचे पूर्व विदर्भ संयोजक प्रफुल्ल माणके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. यापूर्वी त्यांनी निवडणूक आयोगाकडेसुद्धा लेखी तक्रार केली होती. मात्र, निवडणूक आयोगाचेही या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांचे नागपूर हे गृहशहर आहे. त्यांचे शिक्षणही नागपुरातच झाले. त्यामुळे त्यांचे समाजात आणि राजकीय पक्षांसोबत संबंध असल्याची शक्यता नाकारता येत नाही. चांडक हे पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी असून त्यांच्या अधिनस्थ जवळपास ४०० ते ५०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामुळे स्थानिक राजकीय स्थितीवर परिणाम पडू शकतो. ही बाब लक्षात घेऊन व लोकसभा निवडणूक पारदर्शक आणि कोणत्याही दबावाशिवाय पार पडावी यासाठी गृहशहर असलेले चांडक यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी स्वरुपात केली आहे.

हेही वाचा…राज्यात वीज संकट! कोराडीतील ६६० मेगावॉटचा संच बंद

पोलीस अधिकारी अर्चित चांडक यांच्याबाबत आलेल्या तक्रारीची शहानिशा करण्यात येईल. तक्रारीत तथ्य आढल्यास योग्य तो निर्णय घेण्यात येईल. – किरण कुलकर्णी (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य निवडणूक आयोग)

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaint lodged against nagpur police officer archit chandak for violating election commission rule on home town posting during election adk 83 psg