लोकसत्ता टीम

वर्धा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या संघटनेचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेने शिक्षक वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यांच्या विरोधात कुरझडी येथील भाजप नेते प्रभाकर चौधरी यांनी तक्रार केली होती. तसेच या तक्रारीला भाजपचे लोकसभेचे उमेदवार असलेले खा.रामदास तडस यांनी अनुमोदन दिले होते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

विजय कोंबे यांनी काँग्रेसचे उमेदवार अमर काळे यांचा समाजमाध्यमातून प्रचार केल्याचा प्राथमिक ठपका आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याचा आरोप आहे. व्हॉट्सॲपवर कोंबे यांनी ही टीका फॉरवर्ड केली. तसेच ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली होती. त्यावेळी मोदी बसलेले होते. या चित्रावर सुद्धा कोंबे यांनी टिका केल्याचा आरोप आहे.

आणखी वाचा-गडचिरोली : दीड लाखांचे बक्षीस असलेल्या कट्टर नक्षल समर्थकास अटक

या आरोपाच्या आधारे कोंबे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी झाली. त्याची तात्काळ दखल घेत वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुक्रवारी रात्री देवळी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक असलेल्या विजय कोंबे यांच्यावर निलंबनाचा बडगा उगारला. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी शनिवारी सायंकाळी यास दुजोरा दिला. आचारसंहितेच्या तरतुदीनुसार ही कारवाई तात्काळ करण्यात आली.

निलंबित शिक्षकास त्याचे म्हणणे मांडण्याची संधी पुढील टप्प्यात दिल्या जाईल, असे घुगे म्हणाले. तर निलंबित करण्यात आलेले विजय कोंबे यांना विचारणा केल्यावर ते म्हणाले की निलंबनाचा आदेश अद्याप मला मिळालेला नाही. पण मला मुख्यालय न सोडण्याचा संदेश आला होता. त्यामुळे कारवाई झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मी कुठलेही चुकीचे काम केले नाही. हा हितशत्रूंनी घडवून आणलेला प्रकार असु शकतो. अद्याप मला माझी बाजू मांडण्याची संधी मिळालेली नाही. आता कामकाज सुरू झाल्यावरच सोमवारी मला नेमके काय झाले कळेल, असे मत कोंबे यांनी व्यक्त केले.

आणखी वाचा-अकोला : दूषित पाण्यामुळे ४९ ग्रामस्थांची प्रकृती बिघडली

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ही जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी कार्यरत असलेली राज्यातील बलाढ्य संघटना समजली जाते. संघटनेने विविध आंदोलने गाजविली. या संघटनेत जिल्हाध्यक्ष म्हणून कामाची सुरूवात करतांना विजय कोंबे यांनी आपल्या दमदार नेतृत्वाने राज्य संघटनेचे अध्यक्षपद खेचून आणले. त्यांच्यावरील या कारवाईने काय पडसाद उमटतील, हे पुढेच दिसेल.

Story img Loader