नागपूर : मेडिकल रुग्णालयात निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहातील स्नानगृहात महिला डॉक्टरच्या व्हिडीओचे प्रकरण शांतही होत नाही तोच लैंगिक शोषणाची आणखी एक तक्रार दाखल झाल्याने मेडिकलमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे. मानसोपचार विभागाच्या कंत्राटी महिला डॉक्टरने तेथील वरिष्ठ डॉक्टरांविरोधात अधिष्ठातांकडे ही तक्रार केली आहे. त्यावर तडकाफडकी चौकशी समिती नेमण्यात आली आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूत्रांच्या माहितीनुसार, मानसोपचार विभागात सहा महिन्यांपासून कार्यरत एका कंत्राटी महिला डॉक्टरने विशिष्ट वरिष्ठ डॉक्टर विनाकारण त्रास देत असल्याची तक्रार केली. तक्रार आल्यानंतर अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी ४ सदस्यांची चौकशी समिती नेमली. शुक्रवारी समितीने विभागप्रमुखांसह इतर डॉक्टर आणि तक्रारदार यांना चौकशीसाठी बोलावत सर्वांचे जबाब नोंदविले. समितीने सर्व बाबींवरही विचारमंथन केले. महिला डॉक्टरांच्या तक्रारीतील तथ्यही तपासण्यात आले. आता समिती आपला अहवाल अधिष्ठातांना सादर करणार आहे. त्यानंतरच पुढील कारवाई निश्चित होईल.

हेही वाचा – वर्धा पोलीस उत्कृष्ट तपासात राज्यात अव्वल; सबळ पुरावा नसताना जळीत कांडातील आरोपींना केले गजाआड

हेही वाचा – देशात तीन दशकांमध्ये १३७७ वाघांची शिकार! वाघांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर

तक्रार काय?

कपडे पाहून करायचे शेरेबाजी

सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित वरिष्ठ डॉक्टर कपडे पाहून त्या महिला डॉक्टरवर शेरेबाजी करायचे. कारण नसताना आपल्या केबिनमध्ये बसवून ठेवायचे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaint of sexual harassment against a senior doctor in medical in nagpur mnb 82 ssb
Show comments