राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परीक्षेच्या कामासाठी कंपनी शोधण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. मात्र,त्यातील परीक्षेचा खर्च,त्यासाठी कंपनीची गुंतवणूक आदी अटी बघीतल्यास एखाद्या विशिष्ट कंपनीसाठीच या निविदा तयार करण्यात आल्या, असा आरोप अधिसभा सदस्यांनी केला असून त्याची तक्रार थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा कड़े केली आहे. विद्यापीठाने काढलेल्या निविदांमध्ये गेल्यावेळी कंपनाची तीन वर्षांत ५ कोटींच्या उलाढाल पात्र धरण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>वर्धा: शरद पवारांच्या दौऱ्यावरून वाद; माजी खासदार म्हणतात दौरा यशस्वी होईल, तर…

मात्र, यावर्षी ती अट ९५ कोटींनी वाढवित ज्या कंपनीची तीन वर्षांची वार्षिक उलाढाल १०० कोटी आहे. तिलाच पात्र करण्याची अट टाकण्यात आली. विशेष म्हणजे, त्यासाठी केवळ एमकेसीएल वा टीसीएस सारख्या कंपन्याच अर्ज करण्यास पात्र ठरतात. दुसरीकडे यापूर्वीच्या निविदेमध्ये पात्र कंपनीला मनुष्यबळ पुरविणे, साहित्य पुरविणे, सॉफ्टवेअर, मशीन ज्यामध्ये सर्व्हर, संगणक, प्रिंटर आणि कार्टेजसह इतर साधनांचा समावेश होता. मात्र, यावेळी इतका पैसा देऊनही त्या कंपनीला केवळ सॉफ्टवेअर आणि ट्रेनिंग वेंडरच द्यावे लागणार असून इतर सर्व जबाबदारी विद्यापीठाची राहणार आहे. त्यामुळे जास्त पैसा देऊनही अधिकची कामे विद्यापीठालाच करावी लागणार आहेत. हे संपूर्ण निविदा प्रकरण संशयास्पद असून याची चौकशी करावी अशी मागणी राज्यपालांना करण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaint to governor bhagat singh koshyari regarding the company investment tender dag 87 amy