लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्धा : निवडणूक कार्यालय दक्ष म्हणून तक्रार करीत न्याय मागण्याची भूमिका अनेक उमेदवार घेत आहे. आज काँग्रेस जिलाध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी निवडणूक कार्यालयाकडे तक्रार केली. भाजप उमेदवार राजेश बकाने हे काँग्रेस उमेदवार रणजित कांबळे यांच्याविषयी खोटी व बदनामीकरक माहिती आपल्या प्रचार यंत्रेणेतून फिरवत आहे. तसे काहीच नाही असं प्रचार करणारे ऑटो त्वरित बंड करावे, अशी विनंती चांदुरकर यांनी तक्रारीत केली आहे.

तसेच सेवाग्राम पोलिसांना सूचित केल्याचे ते म्हणाले. या तक्रारीत नमूद आहे की भाजप उमेदवार राजेश बकाने हे प्रचार ऑटो फिरवीत आहे. यात वाजणारा ऑडिओ हा आघाडी उमेदवार रणजित कांबळे यांची बदनामी करणारा आहे. यात रणजित प्रताप कांबळे हे ठेकेदार, रेती माफिया, गुन्हेगारीवृत्तीचे उमेदवार असलेल्या काँग्रेसीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेसचे उमेदवार असून त्यास तिलांजली देणारी ही निवडणूक आहे. वर्ध्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पेट्रोल पंप उभारण्याचे समर्थन करणाऱ्या आमदारास पाडायचे आहे. असे बिनबुडाचे आरोप या ऑडिओ मधून होत आहे.

आणखी वाचा-…तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत प्रवेशच मिळणार नाही!

या ऑडिओ मधून आमच्या पक्षाच्या उमेदवारबद्दल बदनामी करण्याचे षडयंत्र होत आहे. तसेच आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केल्या जात आहे. म्हणून तात्काळ कारवाई करावी. तसेच या तक्रारीसोबत सदर ऑडिओ क्लिप देत असल्याचे जिलाध्यक्ष चांदुरकर नमूद करतात. काही ऑटो जप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. रेती माफिया हा शोध त्यांनी कसं लावला, याचा खुलासा करावा असे चांदुरकर म्हणतात. निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे ही तक्रार दाखल झाली आहे. तर उशीरा संपर्क झाल्यावर बकाने म्हणाले की काय कसं प्रचार होत आहे, हे माहित नाही. मात्र प्रचार आटोपल्यावर माहिती घेतो. बिनबुडाचे नाहक आरोप करणारा मी नाही हे उभ्या मतदारसंघस माहित आहे. मी माझ्या प्रतिमेवार जिंकणार असल्याने षडयंत्र रचण्याची गरज नसल्याचे बकाने म्हणाले.

आणखी वाचा-बंडखोरांवर कारवाईचा बडगा, अकोला ग्रामीण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निलंबित

ही निवडणूक भाजपने फार मनावर घेतल्याचे दिसून येते. भाजपचे सर्व नेते ईथे तळ ठोकून आहे. काँग्रेस उमेदवार रणजित कांबळे हे सर्व तयारीनीशी मैदानात उतरत असल्याची नेहमी चर्चा होते. म्हणून भाजप नेते पण सर्व सज्ज असल्याचे म्हटल्या जाते. आज घडलेला प्रसंग हा आगामी घडामोडीची चुणूक समजल्या जात आहे. सेवाग्राम पोलिसांनी अद्याप कसलीच तक्रार नसल्याचे नमूद केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaint with allegations against ranjit kamble says he is sand mafia and gangster pmd 64 mrj