ज्येष्ठ गायक आणि संगीतकार रवींद्र जैन यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जीवन आश्रम विकास संस्थेच्या वतीने संस्थेच्या मदतीसाठी रवींद्र जैन यांचा रविवारी वसंतराव देशपांडे सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ते एक दिवस आधी म्हणजे, शनिवारी नागपुरात आले होते. मात्र, रात्री प्रकृती खालावली होती. यानंतर त्यांना अर्धागवायूचा झटका आला. त्यामुळे रविवारी त्यांना धंतोलीतील प्लॅटिना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी सकाळी प्रकृती बिघडल्याने त्यांना शंकरनगरातील वोक्हार्ट रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे.