नागपूर: रेल्वे मंत्रालयाने वातानुकूलित सेवा असलेल्या गाड्यांमध्ये सवलत लागू करण्याचे अधिकार विभागीय रेल्वेला सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना एसी चेअर कार, एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये लागू होईल. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये या दोन्ही प्रकारचे डबे आहेत.
मूळ भाड्यावर कमाल २५ टक्के सवलत राहणार आहे. इतर शुल्क उदा: आरक्षण शुल्क, सुपर फास्ट अधिभार, जीएसटी इ. स्वतंत्रपणे आकारले जातील. ही सवलत त्वरित प्रभावाने लागू केली जाईल. ही योजना सुट्टी/सण विशेष म्हणून सुरू केलेल्या विशेष गाड्यांवर लागू होणार नाही.
हेही वाचा… रेल्वेच्या बैठकीत खासदारांची रुची नसण्याची कारण काय; जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांबाबत उदासीनता
वंदे भारत एक्सप्रेसचे भाडे वाजवीपेक्षा अधिक असल्याची तक्रार प्रवाशांची होती. अनेक मार्गावर या गाडीला अत्यल्प प्रतिसाद आहे. त्यामुळे रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.