लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अकोला : आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहन तोडफोड प्रकरणात सहभागी मनसैनिक जय मोलाकार यांचा हृदयविकाराच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज त्यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. अमित ठाकरे आल्यावर कुटुंबाचे अश्रू अनावर झाले होते. यावेळी अमित ठाकरे यांनी कुटुंबाला धीर दिला. यावेळी त्यांनी कुठलेही राजकीय भाष्य करणे टाळले.
अजित पवार पुण्यात नसतानाही येथील धरणे भरल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्या टीकेला आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे ‘सुपारीबहाद्दर’ असल्याची टीका त्यांनी केली होती. या टीकेमुळे मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले. यातून अमोल मिटकरी यांच्या वाहनाची अकोल्यात तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर आमदार अमोल मिटकरी यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी १३ मनसेच्या पदाधिकारी व मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला. दरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावर हल्ला प्रकरणात सहभागी मनसैनिक जय मालोकार यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मंगळवारी रात्री मृत्यू झाला. तबाव व तणावातून मनसैनिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. जय मालोकार यांच्या निधनामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, मनसेचे नेते व राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे मनसैनिकाच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आज अकोल्यात दाखल झाले. जिल्ह्यातील निंबी मालोकार गावात जाऊन त्यांनी कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. आपण कोणतेही राजकारण करण्यासाठी येथे आलो नसून केवळ कुटुंबाची भेट व सांत्वन करण्यासाठी आल्याचे अमित ठाकरे म्हणाले. जय मालोकार यांच्या मृत्युच्या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले. राज ठाकरे देखील कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी येतील. त्यांनी आता संपूर्ण कुटुंबाची विचारपूस केली, असे देखील ते म्हणाले. यावेळी जय मालोकार यांचे आई-वडील, भाऊ व इतर नातेवाईक उपस्थित होते.
मनसेकडून आर्थिक मदत
मनसैनिक जय मालोकार यांच्या मृत्यूनंतर आज अमित ठाकरे यांनी कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी अमित ठाकरे यांनी मालोकार कुटुंबाला मनसेकडून आर्थिक मदत देखील सुपुर्द केली.
मरणोपरांत जिल्हाध्यक्ष पद
मनसैनिक जय मालोकार यांची भविष्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष होण्याची इच्छा होती. ती इच्छा मरणोपरांत पूर्ण करण्यासाठी जय मालोकार यांना स्थायी स्वरूपाचे जिल्हाध्यक्षपद देण्यात येईल, असे अमित ठाकरे यांनी कुटुंबाला सांगितले.