नागपूर : नागपूर महापालिकेने कंत्राटी शिक्षक भरतीसाठी दिलेल्या जाहिरातीमध्ये राज्य सरकारने ठरवून दिलेले पात्रतेच्या निकषांना मूठमाती देण्यात आली आहे. थेट मुलाखतीद्वारे पदभरती केली जाणार आहे. हे सर्व मनमानी प्रकार आपल्या मर्जीतील उमेदवारांना संधी देण्यासाठी करण्यात आले आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ता ॲड. राहुल झांबरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिकेने १३ जुलै २०२३ रोजी जाहिरात दिली. यामध्ये माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळेकरिता कंत्राटी शिक्षक भरतीकरिता माध्यमनिहाय व विषयनिहाय अनुक्रमे ६३ आणि २० पद भरली जाणार आहेत. राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभागाच्या ३० जून २०१६ ला निर्णयानुसार (जीआर) राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाचा सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी (वर्ग १ ते ८) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य केली आहे. तसेच ८ ते १० आणि ११ ते १२ वर्गासाठीही टीईटी आणि टीएआयटी ही परीक्षा बंधनकारक केली आहे. असे असताना नागपूर महापालिकेने दिलेल्या जाहिरातीमध्ये अशा कुठल्याही पात्रता परीक्षेचे निकष लावण्यात आले नाही.

हेही वाचा >>>नागपूर: सौदी अरेबियातून दहशतवादी संघटनेशी जुळला अफसर, कोट्यवधीचा निधी जमवण्याची जबाबदारी

हेही वाचा >>>चंद्रपूर: गडचिरोलीच्या सीमेवर शिकारी सक्रिय, मोठ्या पट्टेदार वाघाची शिकार!

तसेच या पदांकरिता महापालिकेत आकृतीबंध मंजूर असून सुद्धा यासाठी कायमस्वरूपी पदांची जाहिरात न काढता त्याला कंत्राटी पदे काढून मनमर्जी चालवण्याचा हा प्रकार दिसून येत आहे. याचा हेतू हितसंबंधीयांना भरती करण्याचा आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion of eligibility criteria in municipal teacher recruitment nagpur rbt 74 amy