चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ बघायला मिळाला. बहुसंख्य मतदार केंद्रांवर मतदार याद्यांमधून अनेकांची नावे गाळल्याचा, जिवंत व्यक्ती मृत तर मृत व्यक्ती जिवंत असल्याची नोंद दिसून आली. राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षांपासून, पत्रकार व अनेक प्रतिष्ठितांची नावे मतदार यादीत नव्हती. बिनबा, घुटकाळा परिसरातील बहुसंख्य मतदान केंद्रातील याद्यांमधून मुस्लीम व दलित समाजाच्या मतदारांची नावे शेकडोंच्या संख्येने यादीतून गायब होती.

शहर तसेच जिल्ह्यात सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. मात्र, सकाळपासून बहुसंख्य मतदान केंद्रांवर मतदार याद्यांचा घोळ येथे बघायला मिळाला. निवडणुकीच्या काळात मतदार यादीतील गैरप्रकारामुळे बहुसंख्य मतदारांची नावे वगळण्याची घटना घडली आहे. आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांचेही नाव गैरप्रकारामुळे मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. यासंदर्भात त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून गैरप्रकारांची चौकशी समिती स्थापन करून कारवाई करण्याची मागणी केली.

Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
judge detained corruption charges
सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश लाचप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात
What is dispute over historic Durgadi Fort and what did court say while handing over fort to government
ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा वाद काय आहे? त्यावर मुस्लिमांचा दावा कसा? किल्ला सरकारच्या ताब्यात देताना न्यायालयाने काय म्हटले?
Despite the Pedestrian Safety Policy non implementation forces pedestrians to walk on roads
पदपथ धोरण कागदावर, पादचारी आले ‘रस्त्यावर’
governor scam marathi news
नाशिकच्या ठकबाजाकडून नागपुरात गोशाळा उभारण्यासाठी तीन कोटी
pimpri chinchwad property tax marathi news
पिंपरी-चिंचवडमध्ये अडीच लाख मालमत्ताधारकांनी बुडविला कर
There has been demand for law requiring judges to disclose their assets like MPs and mlas
न्यायाधीशांची संपत्ती सार्वजनिक करण्याबाबत कायदा? केंद्र शासन म्हणतेय…

हेही वाचा – ‘मोदींची गॅरंटी’ म्हणजे क्षणाक्षणाची मेहनत! वर्ध्यात नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

ही बाब लोकशाहीला मोठा धक्का देणारी आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले आहे. इन्स्पायर इन्स्टिट्यूटचे प्रा. विजय बदखल व त्यांच्या पत्नी माधवी बदखल, राहुल बदखल, मृणालिनी चिलबुले यांची नावेही मतदार यादीत नाहीत. त्यांनी याप्रकरणी तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल केली. पत्रकार एजाज अली यांचेही नाव यादीत नव्हते. मीनाक्षी हेडाऊ यांचे नाव मतदार यादीत नव्हते, मात्र त्यांचे दिवंगत पती यांचे नाव यादीत होते. सुगंधाबाई रावजी खोब्रागडे ही महिला जिवंत आहे. मात्र तिला मृत दाखवून नावासमोर ‘डीलिट’ दाखवले आहे. हाच प्रकार शहरातील अनेकांच्या बाबतीत झालेला बघायल मिळाला आहे. विजय घोनमोडे, कृष्णकन्हैय्या सिंग, कैलास सातपुते, मोहरम अन्सारी, राहुल बिराडे, रवी पिंपळकर, आकाश बंडीवार, वंदना बंडीवार, सिध्दार्थ रामटेके, अल्का रामटेके, विजया मेश्राम, मंदा आत्राम, खान रहेमतुल्लाह, रमेश चौधरी, रूपश्री चौधरी यांच्यासह शेकडो नावे मतदार यादीतून गहाळ होती. त्यामुळे यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले.

घुटकाळा, बिनबा परिसरातील नेहरू कॉलेज, रफी अहमद किदवाई या मतदान केंद्रावरून अनेक मुस्लीम व दलित समाजाच्या मतदारांची नावे गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. अनेक जिवंत व्यक्तींच्या नावासमोर ‘डीलिट’ असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांनी चिडून जिल्हा प्रशासन व निवडणूक केंद्र अधिकारी यांच्यावर संताप व्यक्त केला. मतदान ओळखपत्र आहे, मात्र ते अपडेट केले नाही या कारणामुळे देखील अनेक नावे मतदार यादीतून गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. हिस्लॉप कॉलेज, भवापूर प्रभाग तसेच तुकूम प्रभागातील मतदान केंद्रातील यादीत अनेक मतदारांची नावे नव्हती. मतदार यादी गैरप्रकारामुळे नावे वगळण्याची ही घटना अत्यंत गंभीर असून याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे. लोकशाही व्यवस्थेतील मतदानाचे महत्त्व लक्षात घेता ही घटना अतिशय गंभीर आहे. आम आदमी पक्षाने निवडणूक आयोगाकडे याकडे तत्काळ लक्ष देण्याची व गैरप्रकारांची सखोल चोकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा – पीएसआय संजय सोनवणे म्हणतात, “मी पोलीस आयुक्तांना ओळखत नाही,” नेमका काय आहे प्रकार? जाणून घ्या…

यासंदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा यांना विचारणा केली असता, शहरातील बहुसंख्य मतदान केंद्रातून मतदारांची नावे वगळल्याच्या तक्रारी मिळाल्याची माहिती दिली. शहरात हा प्रकार मोठ्या प्रमाणात झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे. अनेकांनी घर बदलताना पत्ता बदलला नाही, त्यामुळेही असे प्रकार घडले आहे. मतदार यादीतून नाव वगळताना, ‘डीलिट’ करताना किंवा मृताचे नाव वगळताना कुटुंबीयांचे, शेजारच्यांकडून माहिती घेतलेली होती. गेल्या एक वर्षात दोन वेळा मतदार यादी तपासणी कार्यक्रम राबवला. त्यानंतरही असा प्रकार घडल्याचे गौडा म्हणाले.

काँग्रेस उमेदवाराच्या नावासमोर ‘कॅन्सल स्टॅम्प’

शहरातील हिंदी सिटी हायस्कूलच्या मतदान केंद्रावर प्रदर्शित झालेल्या उमेदवारांच्या यादीत काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या नावासमोर कोणीतरी रद्दचा शिक्का लावल्याने मोठा गोंधळ झाला. ही बाब काँग्रेस कार्यकर्त्यांना समजताच अनेक जण मतदान केंद्रावर आले. काँग्रेस उमेदवाराच्या नावासमोर कॅन्सल स्टॅम्प लावण्याच्या या खोडसाळ घटनेने मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ उडाला, तर काही कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवार मुनगंटीवार यांच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यामुळे केंद्र परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तणाव पाहून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

नवमतदारांमध्ये उत्साह

यावर्षी २४ हजारांपेक्षा अधिक नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नवमतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण बघाया मिळाले. अनेकांनी पहिल्यांदाच मतदान करत असल्याने सकाळीच मतदान केले. प्रथम मतदान करणाऱ्या तरुण, तरुणींनी बोटावरील शाई दाखवून आनंद व्यक्त केला. तर ९० वर्षांवरील वृद्धांनीही मतदान केंद्रात येऊन मतदानाचा हक्क बजावला.

Story img Loader