यूजीसी, एचआरडी आणि राज्य सरकारांमध्ये एकवाक्यता नाही
देवेश गोंडाणे, लोकसत्ता
नागपूर : टाळेबंदीमुळे लांबलेल्या विद्यापीठांच्या परीक्षा केव्हा घ्यायच्या, याबाबत मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व विद्यापीठांमधील यासंदर्भातील जाणकार यांच्यातील परस्परविरोधी मतांमुळे थांबलेल्या परीक्षांच्या गोंधळात भर पडली आहे. यामुळे पदवी व पदव्युत्तरचे राज्यातील सर्व विद्यार्थी बुचकळयात पडले आहेत.
करोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांचे कामकाज मार्चपासून बंद करण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने शैक्षणिक वेळापत्रक आणि परीक्षा याबाबत अभ्यास करून उपाय सुचवण्यासाठी समित्या नेमल्या होत्या. समितीने विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावे किंवा परीक्षा कशा पद्धतीने घ्याव्या, असे दोन्ही पर्याय दिले आहेत. तर रमेश पोखरियाल यांनी मंगळवारी समाजमाध्यमावरील एका कार्यक्रमात प्रथम वर्षांवरील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, असे सांगितले. तर मंगळवारीच शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक घेत परीक्षेसंदर्भात दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार असून तोच सर्वाना बंधनकारक राहील असे जाहीर केले. त्यामुळे थांबलेल्या परीक्षेबाबत आता काय होणार? याबाबत विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
राज्यातील कुठल्याही विद्यापीठांला परीक्षाबाबत स्पष्टता नसल्याने दिशानिर्देश दिले जात नाही. त्यामुळे परीक्षेबाबत नेमके काय होईल? अशी संदिग्धता कायम आहे. या सर्व गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.
प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या राहिलेल्या विषयाच्या परीक्षा आता घेतल्या जाणार नाहीत. विद्यार्थ्यांना दिलेली कामे आणि प्रकल्प अहवालाच्या आधारावर ५० टक्के गुण दिले जातील. ५० टक्के गुणांचे मूल्यांकन त्यांच्या आधी झालेल्या परीक्षांच्या आधारे करून पुढील वर्गात त्यांना प्रवेश दिला जाईल. – रमेश पोखरियाल
यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल. यामध्ये एकाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
– उदय सामंत
विद्यापीठ अनुदान आयोगाचे स्पष्टीकरण
विद्यार्थ्यांना पुढील सत्रातील प्रवेश देण्यात यावा. तसेच १५ ते ३० जुलै दरम्यान परीक्षा घ्याव्या, असे दोन्ही पर्याय देणाऱ्या शिफारशी केल्या आहेत. यासह परीक्षा आणि निकाल कसा द्यावे याचेही मार्गदर्शन दिले आहे.