अकोला : काँग्रेसची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी जाहीर केली. या कार्यकारिणीत वरिष्ठ उपाध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस कोषाध्यक्ष, चिटणीसांसह तब्बल २६६ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या तोंडावर सर्वांना पदे देऊन खूश करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

जिल्हा काँग्रेसच्या कार्यकारिणीचा विस्तार गेल्या काही महिन्यांपासून रखडला होता. जिल्हाध्यक्षांविरोधात काँग्रेसअंतर्गत नाराजीचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या कार्यपद्धतीवर अनेकांनी आक्षेप घेतला. नाराज नेत्यांनी एकत्रित मोट बांधून जिल्हाध्यक्षांविरोधात बैठकादेखील घेतल्या होत्या. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दौऱ्यामध्ये समजूत घालण्याचा प्रयत्न केला. विस्तारित कार्यकारिणीची प्रतीक्षा असतानाच अखेर दिवाळीनंतर त्याचा मुहूर्त निघाला. जाहीर केलेल्या विस्तारित कार्यकारिणीत काँग्रेसअंतर्गत जिल्ह्यातील सर्व गट व नाराज नेत्यांना पदांची खिरापत वाटण्यात आली आहे. या माध्यमातून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?

हेही वाचा – भंडारा : ‘शासन आपल्या दारी’मुळे खोळंबली एसटीची वारी; प्रवाशांचे हाल, शाळांना सुट्टी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोला जिल्हा काँग्रेस (ग्रामीण) विस्तारित कार्यकारिणीला मान्यता दिली. त्यानुसार जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी काँग्रेसची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी घोषित केली. कार्यकारिणीत दोन वरिष्ठ उपाध्यक्ष, २९ उपाध्यक्ष, एक कोषाध्यक्ष, ७० सरचिटणीस, ८२ चिटणीस, ८१ सहचिटणीस, एक प्रसिद्धी प्रमुख अशा एकूण तब्बल २६६ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय कायम निमंत्रित सदस्यांचाही कार्यकारिणीत समावेश आहे. त्यामध्ये सर्व माजी जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, माजी मंत्री, लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील पक्षाचे उमेदवार, प्रदेश पदाधिकारी, आघाड्या, संघटनांचे जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, पक्षाचे जि.प., पं.स. सदस्यांचा समावेश केला आहे.

हेही वाचा – Gautami Patil : गौतमीचा ‘कच कच कांदा’ गाण्यावर नाच आणि स्क्रिनवर विश्वचषक फायनलचा थरार

पदाधिकाऱ्यांची गर्दी, कार्यकर्ते कुठे?

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी इतर पक्ष जोमाने तयारीला लागले असताना काँग्रेसने आता विस्तारित जिल्हा कार्यकारिणीत तब्बल २६६ पदाधिकाऱ्यांचा समावेश केला. या जम्बो कार्यकारिणीत पक्षात कार्य करणारे बहुतांश पदाधिकारी झाले आहेत. पक्षात पदाधिकाऱ्यांची गर्दी असून कार्यकर्ते कुठे आहेत? असा प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित होत आहे. गटातटात विभागलेल्या काँग्रेसचे जिल्ह्यात पक्ष संघटन अत्यंत कमकुवत असल्याचे दिसून येते. निवडणुकांमध्ये या विस्तारित कार्यकारिणीचा फायदा होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader