चंद्रपूर : हो, तुम्ही वाचताय ते खरे आहे. असे घडले आहे. निवडणुकीसाठी चक्क काँग्रेस-भाजप हे घोर विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. जिल्ह्यात १२ बाजार समित्यांच्या २१६ संचालकपदासाठी २८ व ३० एप्रिलला मतदान होत आहे. चंद्रपूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस व भाजप अशी युती झाली आहे. तत्कालीन सभापती दिनेश चोखारे यांना पराभूत करण्यासाठी ही युती झाली आहे. मतदारांची मोजकी संख्या असल्याने व ते इतरत्र भटकू नये यासाठी मांसाहारी मेजवानी, पर्यटन, तिर्थाटनाचे प्रयोग बाजार समितीच्या राजकीय आखाड्यात सुरू आहेत. ऐन मतदानाच्या दिवशीच मतदारांना केंद्रावर आणण्यात येणार आहे. गावा-गावात जेवनावळी उठत असून मतदारांना विविध प्रलोभने दाखविली जात आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली असून कोणाचे पार जड आहे हे अद्यापही कळायला मार्ग नाही.

जिल्ह्यात गोंडपिपरी, भद्रावती, पोंभूर्णा या तीन बाजार समित्यांची निवडणूक ३० एप्रिलला होणार आहे. कोरपना, राजुरा, चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, नागभिड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, मूल बाजार समित्यांसाठी शुक्रवार २८ एप्रिलला मतदान आहे. २१८ संचालकपदासाठी सहकारी संस्था, ग्रामपंचायत, अडते, व्यापारी, हमाल, मापारी अशा चार मतदारसंघातून ४७६ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी १३ हजार १९७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Stock market hits 650-point high with Sensex
मार्केट-वेध : सेन्सेक्स सावरला; पण बाजारातील तेजीचे पतंग काटले जाणार की, मोठी भरारी घेणार?
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Rupee sinks to record low, settles 66 paise down
रुपयाची दोन वर्षांतील सर्वांत मोठी गटांगळी
Chandrapur district bank recruitment
चंद्रपूर : जिल्हा बँक नोकर भरती; खासगी बाऊन्सर लावून मुलाखती अन्‌‌ शंभर कोटींचा…
Dr Kartik Karkera from Mumbai
मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा नाशिक मविप्र मॅरेथॉन -२०२५ चा विजेता, पहिले तीनही धावपटू महाराष्ट्रातील
Image of a lottery ticket
स्वप्नात दिसलेल्या नंबरचे लॉटरी तिकिट घेतले अन् महिला जिंकली ४२ लाख रुपये; पती म्हणाला, “मला काही हे…”
Tirupati stampede
Tirupati stampede : तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू
Atul Subhash suicide case child custody
Atul Subhash Case: ‘आजी त्याच्यासाठी अनोळखी’, अतुल सुभाष यांच्या आईला नातवाचा ताबा देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
Story img Loader