चंद्रपूर : हो, तुम्ही वाचताय ते खरे आहे. असे घडले आहे. निवडणुकीसाठी चक्क काँग्रेस-भाजप हे घोर विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. जिल्ह्यात १२ बाजार समित्यांच्या २१६ संचालकपदासाठी २८ व ३० एप्रिलला मतदान होत आहे. चंद्रपूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस व भाजप अशी युती झाली आहे. तत्कालीन सभापती दिनेश चोखारे यांना पराभूत करण्यासाठी ही युती झाली आहे. मतदारांची मोजकी संख्या असल्याने व ते इतरत्र भटकू नये यासाठी मांसाहारी मेजवानी, पर्यटन, तिर्थाटनाचे प्रयोग बाजार समितीच्या राजकीय आखाड्यात सुरू आहेत. ऐन मतदानाच्या दिवशीच मतदारांना केंद्रावर आणण्यात येणार आहे. गावा-गावात जेवनावळी उठत असून मतदारांना विविध प्रलोभने दाखविली जात आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली असून कोणाचे पार जड आहे हे अद्यापही कळायला मार्ग नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in