लोकसत्ता टीम
बुलढाणा: जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी बेमुदत संपावर गेलेल्या जिल्ह्यातील ३० हजारावर कर्मचाऱ्यांना अनेक कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. आता यात राजकीय पक्षही पुढे सरसावले असल्याचे चित्र आहे.
यामध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा समावेश आहे. मोताळा येथे काँग्रेसच्यावतीने संपकरी कर्मचाऱ्यांसह ठिय्या देत पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी तहसीलदारांच्या माध्यमाने सरकारला निवेदन पाठवून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी गणेशसिंह राजपूत, तुळशीराम नाईक, अतिष इंगळे, गजानन मामलकर, श्याम नरवाडे, विशाल बावस्कर, उषा नरवाडे आदी पदाधिकारी हजर होते.
आणखी वाचा- बुलढाणा: संपामुळे नागरिक फिरकेना; १३ तहसील कार्यालये ओस
दरम्यान, संग्रामपुरात ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष रवींद्र झाडोकार, कैलास कडाळे, जनार्दन कुऱ्हाळे, श्रीराम दाभाडे यांनी रस्त्यावर उतरत कर्मचाऱ्यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच तहसीलदार यांना निवेदन दिले.