नागपूर : विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला दोन दिवस शिल्लक असताना उत्तर नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत यांचे चित्रफित प्रसारित झाली आहे. त्यात ते जय भीम म्हणतो म्हणून मंत्रिपद गेले होते, असे वक्तव्य करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समाजमाध्यमांवर एक चित्रफित प्रसारित होत आहे. त्यामध्ये दिवंगत विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी कशी गेली, याविषयी राऊत बोलताना दिसत आहेत. डॉ. राऊत म्हणतात, मंत्रीपदाच्या यादीमध्ये नाव असताना ऐनवेळी आपल्याला डावलो गेले. त्यांनी स्व. विलासराव देशमुख यांच्याविषयी चित्रफितीमध्ये भाष्य केले आहे. नितीन राऊत कुठल्यातरी सभेत बोलताना दिसून येत आहे.

हेही वाचा…‘बटेंगे तो कटेंगे’ १०० टक्के मतदानासाठी हिंदू संस्था…

मात्र, डॉ. नितीन राऊत यांनी विरोधक ‘फेक नरेटीव्ह’ पसरवून चारित्र्य मलिन करत असल्याचा आरोप केला आहे. याविषयी राऊत यांनी खुलासा केला आहे. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला सच्चा अनुयायी आहे. ‘जय भीम’ हा नुसता नारा नाही श्वास आहे माझ्यासह कोट्यावधी अनुयायांचा. काँग्रेस पक्षात वावरत असताना कोणीही मला ‘जयभीम’ म्हणण्या पासून रोखले नाही. माजी मुख्यमंत्री विलासराव यांनी तर मुळीच नाही. याउलट त्यांनी माझ्या मतदारसंघात रूग्णालय व अनुसंधान केंद्र दिले व त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव सुद्धा दिले आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

चित्रफितीमध्ये काय…

दिवंगत विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी कशी गेली, याविषयी राऊत व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत. ते म्हणाले की, विलासराव देशमुख यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित झाल्यानंतर त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं की, कॅबिनेटमध्ये तुमचं नाव आहे. तुम्ही तयारीला लागा. परंतु ज्यावेळी शपथविधी होणार होता. त्यावेळी सांगण्यात आलं की, यादीतून तुमचं नाव गाळण्यात आलं. म्हणून मी दीड महिना मंत्रालयात गेलो नव्हतो.

हेही वाचा…बडोलेंना राष्ट्रवादीत पाठवण्याचा निर्णय माझा व फडणवीसांचा, गडकरी

नितीन राऊत पुढे म्हणतात, दीड महिन्यानंतर जेव्हा मी मंत्रालयात जेव्हा कामानिमित्त गेलो. तेव्हा मुख्यमंत्र्यांकडे जायला निघालो. सहाव्या मजल्यावर मंत्रिमंडळाची बैठक होती. मी गेल्यानंतर ही बैठक संपली. एकनाथराव गायकवाड राज्यमंत्री झाले होते. त्यांनी मला मध्येच अडवले आणि माझा हात धरुन बाजूला नेले. त्यानंतर सांगू लागले, नितीनभाऊ, आपण विलासरावजींना भेटायला चालला आहात म्हणून मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुम्ही विलासराव देशमुखांना जे जय भीम म्हणता ना, ते जय भीम म्हणणे सोडून द्या. कारण त्याच्यामुळे तुमचे मंत्रिपद गेले आहे. आता मला सांगा, माझे मंत्रिपद जय भीम म्हणण्याने गेले असेल तर यापेक्षा मोठा अभिमान कोणता असू शकतो.” असे नितीन राऊत म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress candidate dr nitin raut said my ministership gone after saying jai bhim rbt 74 sud 02