लोकसत्ता टीम

चंद्रपूर : लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात शीतयुद्ध रंगले असतांना काँग्रेस श्रेष्ठींनी वरोरा-भद्रावतीच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे धानोरकर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून, मिठाई वाटून जल्लोष साजरा केला. येथे आता भाजपचे सुधीर मुनगंटीवार व काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात सरळ लढत होणार आहे. तर विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार यांनी माघार घेतल्याने समर्थकांमध्ये नाराजी आहे.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मुलगी व प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार हिचे नाव समोर केले होते. तर नैसर्गिक न्यायाप्रमाणे पती खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली मृत्युने रिक्त झालेल्या या जागेवर पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दावा सांगितला. या उमेदवारीसाठी वडेट्टीवार व धानोरकर यांच्यात बराच संघर्ष झाला. या दरम्यान धानोरकर यांनी वडेट्टीवार यांच्यावर पतीच्या मृत्युला कारणीभूत असल्यापर्यंतचे गंभीर आरोप केले. दरम्यान काँग्रेस श्रेष्ठींनी वडेट्टीवार यांना एक तर तुम्ही लढा किंवा आमदार धानोरकर यांना संधी द्या असे सांगितले.

आणखी वाचा-गुडन्यूज! राज्यातील एकमेव ‘हत्तीकॅम्प’मध्ये पाळणा हलला, होळीच्या दिवशी ‘राणी’ने दिला गोंडस पिलाला जन्म

शेवटी वडेट्टीवार यांनी लोकसभा लढण्यास काँग्रेस श्रेष्ठींकडे असमर्थता दर्शविल्यानंतर होळीच्या पावन पर्वावर आमदार धानोरकर यांची उमेदवारी जाहीर केली. साध्या गृहिणी राहिलेल्या प्रतिभा धानोरकर यांनी २०१९ मध्ये सर्वप्रथम भद्रावती-वरोरा मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढविली. या निवडणुकीत धानोरकर दहा हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यांनी माजी मंत्री संजय देवतळे यांचा पराभव केला होता.

विशेष म्हणजे, वरोरा येथून काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे पती खासदार बाळू धानोरकर यांना बराच संघर्ष करावा लागला होता. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या धानोरकर तेव्हा काँग्रेसच्या साध्या सदस्यही नव्हत्या. मात्र आता त्यांना आमदारकी सोबतच खासदारकीची तिकीट काँग्रेस पक्षाने दिली आहे. तिकीट जाहीर होताच धानोरकर समर्थकांनी येथे जल्लोष साजरा केला. या मतदार संघात आता भाजपचे सुधीर मुनगंटीवार व काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात सरळ लढत होणार आहे. तर वडेट्टीवार यांनी शेवटच्या वेळी माघार घेतल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

आणखी वाचा-काँग्रेसच्या ‘राजीनामावीरां’नी गाठले नागपूर! प्रांताध्यक्षसोबत चर्चा ; पटोले म्हणाले, गडबड करू नका…

वडेट्टीवार यांनी धानोरकर यांना उमेदवारी मिळू नये म्हणून सर्व प्रकारचे प्रयत्न केले. ऐनवेळी माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, आमदार जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, आमदार सुधाकर अडबाले यांना उमेदवारी द्या अशीही मागणी पक्षाकडे केली. मात्र शेवटी धानोरकर यांनी काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांची भेट घेतली. शेवटपर्यंत उमेदवारी नक्की होत नाही हे बघून आमदारकी व पक्ष सोडण्याचा देखील इशारा दिला होता. त्यानंतरच त्यांना ही उमेदवारी दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Story img Loader