नागपूर : काँग्रेसला स्वत:चीच माणसे सांभाळता येत नाहीत. त्यामुळे ते दुसऱ्यावर टीका करतात. त्यांनी प्रथम आपले घर वाचवावे. त्यांचे घर कच्चे झाले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रदेश आणि केंद्रीय नेतृत्वावर आज प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> “तांबे पिता-पुत्रांकडून कॉंग्रेसची फसवणूक” नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “हा धोका…”

 बावनकुळे नागपुरात  प्रसार माध्यमांशी बोलत होते. देशातील आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटते की काँग्रेस डुबते जहाज आहे. त्यामुळे त्या जहाजावर कोणीही बसायला तयार नाही. अमित देशमुख यांनी मी ज्या घरात आहे त्याच घरात राहणार आहे असे सांगितले असले तरी काळ ठरवेल. जर तरला अर्थ नाही. २०२४ मध्ये महाविकास आघाडीच्या तीनही पक्षाला उमेदवार सुद्धा मिळणार नाही.

हेही वाचा >>> “हसन मुश्रीफांना विकत…”, अमोल मिटकरींचा किरीट सोमय्यांवर खळबळजनक आरोप

सत्यजीत तांबे यांनी अजूनही आम्हाला पाठिंबा मागितला नाही. आमच्याकडे आले तर आमच्या राज्य आणि केंद्रीय संसदीय मंडळाकडे हा विषय जाईल आणि ते निर्णय घेतील. आमच्या तीन उमेदवारांनी अर्ज भरले. मात्र त्यांना एबी फॉर्म दिले नाही, असेही बावनकुळे म्हणाले.