अकोला : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला भाजपकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही यात्रा काही निवडक ठिकाणांवरच जाणार असे म्हणणाऱ्या भाजपने भारताचे भूगोल जाणून घ्यावे. भारत तोडो वाल्यांनी थोडाफार भुगोलाचा अभ्यास करावा, अशा शब्दात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले.

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या पूर्व पाहणी दौऱ्यावर आले असता त्यांनी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, कपिल ढोके, प्रदेश सचिव प्रशांत गावंडे, युवक जिल्हाध्यक्ष आकाश कवडे आदी उपस्थित होते. ‘टी-शर्ट घालतोय, लहान मुलं येऊन भेटत असल्याच्या ‘एनसीपीसीआर’मध्ये तक्रारी केल्या. एवढेच नव्हे तर कर्नाटकमध्ये फलक फाडण्यात आले. मात्र, तरीही काँग्रेसच्या एकाही नेत्याने तक्रार नोंदवली नाही. त्यामुळे त्यांना जेवढं वाईट करता येईल तेवढे करू द्या, आपण जेवढं चांगलं करता येईल तेवढे करू. याचा त्यांना एक दिवस पश्चाताप वाटेल,’ असे लोंढे म्हणाले.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
Yogendra Yadav, Bharat Jodo Andolan,
‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
Amit Shah Malkapur, Chainsukh sancheti campaign,
मविआ म्हणजे विकास विरोधी आघाडी, गृहमंत्री अमित शहांचे टीकास्त्र; लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार
Chandrasekhar Bawankule, Chandrasekhar Bawankule ,
महाविकास आघाडीचा जाहीरनामा केवळ घोषणा, बावनकुळेंची टीका
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका

हेही वाचा >>> “उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा राजकीय गेम केला”, मनोहर जोशींचे नाव घेत शिंदे गटातील आमदाराचे गंभीर आरोप

‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत,’ हा भारत जोडोचा संदेश आहे. आता सरळ जरी चालत असलो, तरी त्याचे पडसाद सर्वत्र पडत आहेत. अनेक लोक स्वतःहून यात्रेत सहभागी होत आहेत. ही देशाची गरज आहे. ही यात्रा इकडे तिकडे कुठेही नेता येत नाही. त्यासाठी सरळच जावे लागेल. सरळ गेल्यामुळ थोडाफार लोकांचा भुगोलाचा अभ्यास होईल. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी भारत जोडो यात्रेला गालबोट लावू शकणार नाही, असा तोटा लोंढे यांनी भाजपला लगावला. ॲड. प्रकाश आंबेडकर मनातून यात्रेत सहभागी होतील. ही यात्रा संविधान वाचवण्याचीही आहे. ही यात्रा काँग्रेसची नव्हे तर तिरंग्याची आहे. त्यामुळे ही यात्रा आंबेडकरांची सुद्धा आहे. ते यात्रेत प्रत्यक्ष सहभागी जरी होऊ शकली नाही, तरी मनाने नक्कीच सहभागी आहेत, असा विश्वास लोंढे यांनी व्यक्त केला. ५० खोक्यात काही सत्ता ओके होत नसते. जनतेपेक्षा मी मोठा असं समजणारा एक तर स्वप्रेमात असेल किंवा वेडा असेल. अंधेरीच्या निवडणुकीत या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील, असे लोंढे म्हणाले.