अमरावती : अत्‍यंत चुरशीच्‍या लढतीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी भाजपच्‍या नवनीत राणा यांचा १९ हजार ७३१ मतांनी पराभव केला. वानखडे यांना ५ लाख २६ हजार २७१ मते मिळाली, तर नवनीत राणा यांना ५ लाख ६ हजार ५४० मते प्राप्‍त झाली.

काँग्रेसचे वानखडे यांनी पहिल्‍या फेरीत आघाडी घेतली खरी, पण चौथ्‍या आणि पाचव्‍या फेरीत राणा यांनी मताधिक्‍य नोंदवले. पाचव्‍या फेरीपासून अकराव्‍या फेरीपर्यंत पुन्‍हा वानखडे यांनी आघाडी टिकवून ठेवली. तेराव्‍या आणि चौदाव्‍या फेरीत राणा आघाडीवर होत्‍या. त्‍यामुळे काँग्रेसच्‍या कार्यकर्त्‍यांमध्‍ये अस्‍वस्‍थता पसरली, पण नंतरच्‍या फेऱ्यांमध्‍ये वानखडे यांनी मताधिक्‍य टिकवून ठेवले. सतराव्‍या फेरीअखेर वानखडे यांनी तब्‍बल २४ हजार ३८२ मतांची आघाडी घेतली होती. राणा यांना ४ लाख ६७ हजार ६८७ तर वानखडे यांना ४ लाख ९२ हजार ६९ मते प्राप्‍त झाली होती. अखेरच्‍या फेरीपर्यंत आघाडी कमी झाली, पण वानखडे यांच्‍या विजयावर शिक्‍कामोर्तब झाले.

स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Ravindra Chavan talk on local body elections in exclusive interview with Loksatta
‘शक्तिशाली’ भारतासाठी ‘बलशाली’ भाजप आवश्यक
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
bjp deciding direction of campaign for the delhi assembly elections
लाल किल्ला : दिल्ली निवडणुकीची सूत्रे भाजपच्या हाती?
bjp plan to contest local bodies elections alone after huge success in assembly elections
भाजप शत-प्रतिशतकडे; शिर्डीच्या महाविजयी मेळाव्यात दिशादर्शन; शहांची उपस्थिती

हेही वाचा >>> Akola Lok Sabha Election Result 2024 : अकोल्यात सलग पाचव्यांदा कमळ फुलले; अनुप धोत्रे यांचा ४० हजार ६२६ मतांनी विजय

अमरावती मतदार संघात तिहेरी लढत होईल, असे सांगितले जात होते, पण प्रहार जनशक्‍ती पक्षाला अपेक्षित मतदारांनी फारशी पसंती दिली नाही. प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांना तिसऱ्या क्रमांकाची ८५ हजार ३०० मते मिळाली. रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांनाही मतदारांनी नाकारले. त्‍यांना केवळ १८ हजार ७९३ मते प्राप्‍त झाली. या निवडणुकीत एकूण ३७ उमेदवार रिंगणात होते. त्‍यातील अनेक उमेदवार तीन अंकी आकडा देखील ओलांडू शकले नाहीत.

हेही वाचा >>> Vidharbh Lok Sabha Election Result 2024 : अमरावतीत भाजपची फेरमतमोजणीची मागणी, काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे आघाडीवर

गेल्‍या निवडणुकीत राणा या काँग्रेस, राष्‍ट्रवादीच्‍या पाठिंब्‍यावर अपक्ष म्‍हणून निवडून आल्‍या होत्‍या, पण त्‍यांनी केंद्रातील भाजप सरकारला पाठिंबा दिला होता. निवडणुकीआधी त्‍यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केला आणि अमरावती मतदार संघात प्रथमच भाजपच्‍या कमळ या पक्षचिन्‍हावर निवडणूक लढली गेली. माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या विरोधात उघडलेली मोहीम, हनुमान चालिसा प्रकरणामुळे नवनीत राणा चर्चेत आल्‍या. महायुतीचे घटक असलेल्‍या प्रहार जनशक्‍ती पक्षाचे बच्‍चू कडू यांनी भाजपच्‍या विरोधात उमेदवार उभा करून दिलेले आव्‍हान, राणांच्‍या विरोधकांची एकजूट यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली. काँग्रेस पक्षाने तब्‍बल २८ वर्षांनंतर पंजा या पक्षचिन्‍हावर निवडणूक लढवली. त्‍यात काँग्रेसने आपले जिल्‍ह्यातील वर्चस्‍व सिद्ध केले.

काँग्रेस भवनावर विजयाचा जल्‍लोष

वानखडे यांनी निर्णायक आघाडी घेतल्‍यानंतर काँग्रेसच्‍या कार्यकर्त्‍यांनी शिवटेकडी परिसरातील काँग्रेस भवनात एकच जल्‍लोष केला. कार्यकर्त्‍यांचा एक समूह राजकमल चौकात आनंद व्‍यक्‍त करीत होता, तर मतमोजणी केंद्राबाहेर आणि शहरातील चौकांमधून विजयाचे स्‍वर निनादले. काँग्रेसच्‍या प्रचाराची मुख्‍य धुरा सांभाळणाऱ्या आमदार यशोमती ठाकूर यांनी मतमोजणी केंद्रात पोहचून विजयी उमेदवार वानखडे यांना शुभेच्‍छा दिल्‍या.

Story img Loader