अकोला : इतिहासामध्ये काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडून येऊ दिले नाही. त्याचप्रमाणे अकोल्यातून बाळासाहेब आंबेडकर यांनाही काँग्रेस निवडून येऊ देत नाही, अशी घणाघाती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

अकोल्यातील महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आले असता आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार अमोल मिटकरी आदींसह महायुतीचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते. पुढे ते म्हणाले, अडीच वर्षांपासून विकासाची धुरा अनुप धोत्रे यांनी हातामध्ये घेतली. त्यामुळे एकमताने अनुप धोत्रेंना मैदानात उतरवले. ही देशाची निवडणूक आहे. अनुप धोत्रे यांचे कमळाचे बटन दाबल्यानंतर ते मत नरेंद्र मोदींना भेटते. पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदींना परत बसवण्यासाठी ही निवडणूक आहे.

Two hundred patients of hair loss problem ICMR team in Shegaon
केसगळतीचे रुग्ण दोनशेच्या घरात; ‘आयसिएमआर’चे पथक शेगावात…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Babasaheb Ambedkar , RSS , RSS Karad branch,
संघाविषयी आंबेडकरांच्या ‘आपुलकी’चे सर्व दावे संशयास्पद! 
Viral Video Shows Father And Daughter love
‘काय ते छोटे छोटे घास, काय ते तोंड पुसणे…’ एकाच ताटात बाबांबरोबर जेवणारी लेक; पहिला घास लेकीला, तर दुसरा… VIDEO व्हायरल
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
Pandit Vishnu Rajoria on 4 Children
Video: ‘चार मुलांना जन्म द्या, एक लाख रुपये मिळवा’, ब्राह्मण जोडप्यांसाठी परशुराम मंडळाच्या अध्यक्षांची ऑफर
Baby overcomes respiratory problems after 72 hours of continuous treatment
बाळ जन्मतः रडत नाही? सलग ७२ तास अनोखे उपचार आणि ट्याहां ट्याहां सुरू…
Child marriage exposed in Alandi
पिंपरी : बालविवाहाचा प्रकार आळंदीत उघड

हेही वाचा – यवतमाळ-वाशिममध्ये संजय राठोड विरुद्ध संजय देशमुख ? राठोड म्हणाले, मला उमेदवारी….

आपण सकारात्मकतेने पुढे जात आहोत. पुढे बाळासाहेब येतील, काँग्रेसचा देखील उमेदवार राहील. आपल्याला काही करण्याची गरज नाही. इतिहास तपासून बघा, काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ दिले नाही. अकोल्यामध्ये काँग्रेस बाळासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ देणार नाही. त्यामुळे आपल्याला चिंता करण्याची गरज नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मोदीजींच्या विकासासाठी व समर्थ भारत तयार करण्यासाठी सकारात्मकतेने मत मागायचे आहे. १० वर्षांत नरेंद्र मोदींनी २५ कोटी जनतेला गरिबी रेषेच्या वर आणले. प्रत्येक घटकाचा विचार करून त्याच्यापर्यंत विकास पोहोचवण्याचं कार्य नरेंद्र मोदी यांनी केले आहे. अर्थव्यवस्थेचा विस्तार केला. देशातील वंचितांचा विचार काँग्रेसने किंवा वंचित आघाडी नव्हे तर केवळ नरेंद्र मोदींनी केला आहे. संविधान बदलण्याच्या अफवा पसरवल्या जातात. मात्र, चंद्र, सूर्य आहे तोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला कुणीही हात लावू शकत नाही. संविधानाची हत्या तर १९७५ साली काँग्रेसने केली होती. या नाटकबाजांची नाटकं आता चालणार नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हेही वाचा – आमदार बच्‍चू कडूंचा भाजपला जाहीर सभेत इशारा; म्हणाले, “तुरुंगात टाकले, तरी बेहत्‍तर…”

देशाला जगातील तिसरी मोठी आर्थिक महासत्ता नरेंद्र मोदींना पुढील पाच वर्षात बनवायची आहे. देशात अनेक संधी तयार होणार आहेत. ही निवडणूक जनतेची आहे. देशाच्या विकासाला मत म्हणजे मोदींना मत आहे. अनुप धोत्रे यांच्या पाठीशी महायुतीतील सर्व नेते असून ते आपल्या वडिलांचादेखील विक्रम मोडतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

Story img Loader