वर्धा : निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष आता वेगवेगळे फंडे अंमलात आणणार. प्रत्येकाची शैली वेगळी. पण मतदारराजा कसा पक्षाच्या चिन्हवार वळविणार, याची प्रत्येकास चिंता लागणार, यात नवल नाही. भाजपच्या तुलनेत सोशल फोरमवर काहीसा मागे पडल्याचे म्हटल्या जाणाऱ्या काँग्रेसने आता कात टाकून जोम धरण्याचे प्रयत्न सूरू केल्याचे दिसून येते. नेते संपर्कातच नसतात, अशी ओरड झाल्याने प्रदेश काँग्रेस कार्यालयाने आता सेंट्रल चॅनल म्हणजेच मध्यवर्ती अड्डा तयार केला आहे. विधानसभा निवडणुकीत सक्षमपणे सुसंवाद साधण्यासाठी तो तयार करण्यात आल्याचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांना कळविले आहे. या चॅनलच्या माध्यमातून पक्ष कार्यकर्ते, जिल्हा पदाधिकारी, बूथ प्रमुख व अन्य पदाधिकारी संपर्क साधू शकतील. वरिष्ठ नेत्यांशी संपर्क सहज करता येणार.

विविध बूथ एजेंट यांचे व्यवस्थापन तसेच दिलेल्या कार्यक्रमाची नीट अंमलबजावणी करण्यासाठी लीड बूथ एजेंट हे नवे पद निर्माण करण्यात आले आहे. हा लीड एजेंट सर्वांशी संपर्क साधून तळपातळीवार सर्वांना एकत्रित करीत निवडणूक कार्य करण्याची प्रेरणा निर्माण करणार. तसेच हा लीड एजेंट दिलेल्या विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक १० बूथ एजेंटसाठी मुख्य संवाद दुवा म्हणून काम करणार. पक्षाने दिलेल्या निर्देशांनुसार तळपातळीवर माहिती देणे, प्रशिक्षण व बूथ स्तरावर सूक्ष्म व्यवस्थापन व संवाद सक्षम करणे महत्वाचे ठरणार असल्याचे प्रदेश समिती म्हणते.

jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन

हे ही वाचा…ऑटोचालकाने शाळकरी विद्यार्थीनाली पळवले अन् …

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या निर्देशानुसार पुढील चार दिवसात जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात लीड बूथ एजेंटची नियुक्ती करावी. तो नियुक्त करतांना सर्वांशी संवाद व समन्वय साधणारा सक्षम व्यक्ती असण्याची सूचना आहे. तसे केल्यास पक्षाचे कार्य समर्थपणे विनासायास पार पडण्यास मदत होईल. जिल्हानिहाय चॅनलच्या डेस्क हेडची नियुक्ती करण्यात आली आहे. ते जिल्हाध्यक्षशी संपर्क साधणार आहेत.

हे ही वाचा…लोकजागर: काँग्रेसचा वैरी काँग्रेस!

विविध विभाग व सेलचे कार्य संघटन सरचिटणीस प्रमोद मोरे व मुख्य संयोजक प्रज्ञा वाघमारे हे सांभाळत आहे. या विधानसभा निवडणुका लक्षात घेता विभाग व सेलविषयक बैठका हे दोघे आयोजित करतील. तसेच प्रचार विषय, निष्क्रिय पदाधिकारी काढून टाकण्याच्या हालचाली, कामकाज वाटप, संघटनात्मक बाबी, प्रदेश व जिल्हा पदाधिकारी यांच्यावर तातडीने करण्यात येणारी कारवाई व अन्य कामकाज हे दोघे पाहणार असल्याचेही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.