लोकसत्‍ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमरावती: काँग्रेसने राज्‍यातील शिक्षकांची एकजूट करण्‍याच्‍या उद्देशाने प्रयत्‍न सुरू केले आहेत. राज्यातील शिक्षकांचे सर्व स्तरावरील प्रलंबित प्रश्न प्रलंबित सोडवण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक-पदवीधर आमदारांची एक समिती गठीत करण्यात आली आहे.

शिक्षक-पदवीधर आमदारांच्या या समितीत अध्यक्ष नाना पटोले यांच्याबरोबर माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार वर्षा गायकवाड, आमदार अभिजित वंजारी, आमदार किरण सरनाईक, आमदार जयंतराव आजगावकर, आमदार धीरज लिंगाडे, आमदार सुधाकर अडबाले, माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके हे सदस्य आहेत तर प्रा. प्रकाश सोनावणे हे समन्वयक आहेत.

हेही वाचा… यवतमाळ : ट्रकची बसला धडक, सात प्रवासी जखमी

या समितीच्या माध्यमातून शिक्षकांच्या समस्यांसंदर्भात वेळोवेळी चर्चा करुन सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. राज्यातली शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही समिती एक दबाव गट म्हणून काम करेल, असे सांगण्‍यात आले आहे.