काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला अपघात

नागपूरमधील ऑटोमोटिव्ह चौकात बुधवारी रात्री उशीरा एका ट्रकने नितीन राऊत यांच्या कारला धडक दिली. या अपघातातून नितीन राऊत थोडक्यात बचावले.

Nitin Raut Car Accident nagpur Maharashtra Assembly Election 2024
काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला अपघात ( छायाचित्र – लोकसत्ता टीम )

नागपूर : राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नितीन राऊत यांच्या कारला एका ट्रकने धडक दिल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. सुदैवाने या अपघातामध्ये नितीन राऊता यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूरमधील ऑटोमोटिव्ह चौकात बुधवारी रात्री उशीरा एका ट्रकने नितीन राऊत यांच्या कारला धडक दिली. या अपघातातून नितीन राऊत थोडक्यात बचावले. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह कपिलनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मोठा ताफासुद्धा तैनात करण्यात आला होता. नितीन राऊत यांचा अपघात झाल्याचे वृत्त पसरताच काँग्रेस चे बरेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मध्यरात्री पोलीस ठाण्यात धाव घेतली. राऊत यांची भेट घेऊन विचारपूस केली. या अपघाताप्रकरणी कपिल नगर पोलीस स्टेशनमध्ये ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

हे ही वाचा… व्यक्तिगत लाभाच्या योजनांकडे सर्वच पक्षांची धाव!

प्रचाराहून घरी परत जातांना अपघात

नितीन राऊत हे बुधवारी रात्री प्रचार सभा आटपून घरी जात होते. त्यावेळी नागपुरातील ऑटोमोटिव्ह चौकात त्यांच्या कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की कारमध्ये बसलेल्या नितीन राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जोरदार धक्का बसला. अचानक झालेल्या अपघातामुळे कारमधील सर्व जण घाबरले होते.

अपघाताचा व्हिडिओ झाला व्हायरल

नितीन राऊत यांच्या कारचा अपघात झाल्यानंतर एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला.त्यात कारचे नुकसान झाल्याचे दिसून येते आहे. अपघात कसा घडला याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress leader and former minister nitin raut had a car accident on wednesday adk 83 asj

First published on: 14-11-2024 at 11:17 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा