नागपूर : विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून ११ दिवस झाले असून राज्यात सरकार स्थापनेचा तिढा सुटला आहे. भाजपने देवेंद्र फडणवीस यांना गटनेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. संपूर्ण राज्याला ज्या क्षणाची प्रतिक्षा होती तो क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. शपथविधीला अवघे काही तास शिल्लक आहेत. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतील यात आता कोणतीही शंका नाही. भाजपच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर आता महायुतीकडून राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला.

महायुतीतील प्रमुख नेते राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी पोहोचले. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे राजभवनात दाखल झाले. त्यांनी राज्यपालांकडे समर्थनाचे पत्र दिले आहे. यावेळी आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष देशमुख, प्रविण दरेकर तसेच महायुतीतील अन्य महत्त्वाचे नेते राजभवनावर उपस्थित होते.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा : ‘त्याने’ अनेकांचे प्राण वाचविले; पण त्याचा जीव धोक्यात आला तेव्हा….

या सर्व घडामोडी दुपारी चारच्या सुमारास घडल्या. मात्र, त्यापूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, मंडळातील सदस्यांच्या शपथविधीचे निमंत्रण समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात आले होते. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या नावाने हे निमंत्रण प्रकाशित करण्यात आले. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आझाद मैदानावर ५ डिसेंबरला ५.३० वाजता शिपथविधी सोहोळा आयोजित करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले.

राज्यपालांनी महायुतीला सरकार स्थापनेचे निमंत्रण देण्यापूर्वीच अशाप्रकारे निमंत्रणपत्रिका कशी प्रकाशित करण्यात आली, असा सवाल काँग्रेसचे प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. सोबतच त्यांनी भाजप संविधानाला न मानणार पक्ष आहे. त्यांनी राज्यपालांचे अधिकार देखील आल्याकडे घेतले आहेत, असे या निमंत्रणपत्रिकेवरून दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली. निवडणूक निकाल २३ नोव्हेबरला लागला. बहुमत असून सरकार स्थापनेचा दावा केला गेला नाही. तब्बल ११ दिवस राज्यात कोणतेच सरकार नव्हते. राज्यात राष्ट्रपती शासन देखील लावण्यात आले नव्हते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा : बुलढाणा : हो खरंय; करोडपती आमदार मतदानानंतर ‘लखोपती’!

दरम्यान, राजभवनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर मुंबईतील आझाद मैदानावर गुरूवारी सायंकाळी ५.३० वाजता शपथविधी कार्यक्रम होणार असल्याचे जाहीर केले. आम्ही तिघे मिळून एकत्र सरकार चालवणार असल्यांचे त्यांनी सांगितले. महायुतीकडून सर्व निर्णय एकत्रित घेण्यात येतील असे ते म्हणाले. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचेही आभार मानले.

Story img Loader