नागपूर : उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरसाठी कलंक आहे असे वक्तव्य केले होते. ते योग्यच आहे. भाजपा आता कलंक या शब्दावरून आंदोलन करीत असेल तर त्यांच्या नेत्यांची यापूर्वीची वक्तव्ये तपासून घ्यावी व त्यांच्या विरोधात आंदोलन करावे, असे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले.
हेही वाचा – घरातील डास, झुरळांच्या समस्येने त्रस्त आहात, मग ‘हा’ घरगुती उपाय कराच…
अतुल लोंढे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांची भाषा काय आहे. तेसुद्धा टीका करताना कुठली भाषा वापरतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभेमधील भाषा, राज्याचे वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची जाहीर भाषणातील भाषा कशी असते याचेही भाजपाने आत्मपरीक्षण केले पाहिजे. काँग्रेसकी विधवा, सोशल मीडियाची बारबाला अशी विधाने भाजपाच्या प्रवक्त्यांनी केली आहेत. मात्र त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही. भाषा आणि राजकीय संस्कृती खराब करण्याचे काम हे भाजपाने केले आहे. त्यामुळे फडणवीस यांच्यासाठी कलंक हा शब्द योग्य असल्याची टीका लोंढे यांनी केली.