बुलढाणा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शेगाव शहर माजी  अध्यक्ष दीपक सलामपुरिया यांचा टिप्परने दिलेल्या जोरदार धडकेमध्ये जागीच मृत्यू झाला. शेगाव शहरातील मुरारका उच्च माध्यमिक शाळे जवळील वळणावर आज शुक्रवारी, २८ मार्चला हा दुर्दैवी अपघात घडला.दीपक सलामपुरिया यांची  शेगाव बाळापुर मार्गावर वर मुरारका हायस्कूल जवळ  दूध डेयरी आहे. आज शुक्रवारी दुपारी  ते दुकानावरून समोरच्याच खुल्या जागेत लघवीसाठी गेले होते. तिथून परत येताना रस्ता ओलांडताना  भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.  परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना लगेच  शेगाव येथील सईबाई मोटे शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तेथे त्यांना मृत घोषित केले. भूमी मुक्ती मोर्चाचीराज्य कार्यकारिणी बरखास्त खामगांव येथील  विश्राम भवनात भूमी मुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चा संयुक्त संघटनाची जिल्हास्तरीय बैठक  आज शुक्रवारी पार पडली.

संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे  यांचे मार्गदर्शनात सुपडा इंगळे  यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक पार पडली. यावेळी रमेश गाडेकर,  सारगधर वाकोडे,अशोक इंगळे,भरत मुंडे,संजय पाटील,अमोल पाटील, अनिल कांबळे, शेषराव चव्हाण, शेषराव तायडे,किशोरसिंग राजपूत, सुखदेव कटारे,रामचंद्र नाईक,रमेश इंगळे,  सारंगधार टापरे नाना तायडे आदिची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत गत १ वर्षांपासून संघटनेत कार्य करणाऱ्या काही प्रमुख व जिल्हा,तालुका स्तरीय संघटना नेते व पदाधिकारी यांच्या बेशिस्त वर्तना मुळे संघटनात्मक कार्य मंदावल्याचे भाई अंभोरे यांनी सांगितले. निष्ठावंत  कार्यकर्त्यांना  संधी मिळावी यांस्तव संयुक्त संघटनेची राज्य, जिल्हा व तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची  घोषणा यावेळी करण्यात आली. जिगांव मध्ये जल समाधी महसूल जमीनपट्टे, महसूल जमिनी वरील सौर ऊर्जा प्रकल्प,जिगांव प्रकल्प बाधित अतिक्रमण धारक प्रश्न,पात्र व अपात्र वनजमीन दावेदार, वनदावे वन जमीन मशागत, निवासी घरकुल प्रश्न संभाव्य वनविभाग अधिकारी कर्मचारी अन्याय, आदी विषयावर चर्चा करण्यात आली.

जिल्हा प्रशासनाकडे भूमिहीन सत्याग्रह २० मार्च च्या निवेदनानुसार त्वरित कार्यवाही न झाल्यास जिगांव प्रकल्प मध्ये “जलसमाधी” आंदोलन करण्याचा  संकल्प करण्यात आला .शासन प्रशासन विरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागन्यासाठी जनहित याचिका दाखल करण्याचा बुलडाणा  जिल्ह्यात एप्रिल अखेर “राज्यव्यापी अधिवेशन” घेण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.