सुमित पाकलवार
आदिवासी समाजाबद्दल त्यांच्या समस्यांबाबत कळवळा असलेला नेता अशी ओळख असलेल्या मालू कोपा बोगामी यांच्या हत्येला आज २१ वर्ष पूर्ण होत आहेत. १० फेब्रुवारी २००२ ला नक्षलवाद्यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भामरागड तालुक्यातील लाहेरीच्या जंगलात निर्घृण हत्या केली होती. या हत्येने आदिवासी समाजातील एका सक्षम नेतृत्वाचा नक्षलवाद्यांनी अंत केला, अशी भावना त्यावेळी होती. आजही त्या परिसरातील नागरिकांशी संवाद साधला असता ते बोगामी यांच्या कारकिर्दीबद्दल भरभरून बोलतात.
हेही वाचा >>>नागपूर: विद्यापीठाच्या परीक्षेत पुन्हा चुका; जुन्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका
१९८० च्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यात शिरकाव करणाऱ्या रक्तरंजित नक्षलवादी चळवळीने आजतागायत मोठे नुकसान केले आहे. आदिवासी समाज असो की नेते कायम त्यांच्या निशाण्यावर राहिले आहेत. सध्याच्या घडीला जिल्ह्यात ही चळवळ खिळखिळी झाली असली तरी त्यांनी दिलेल्या जखमा आजही ताज्या आहे. त्यात मालू कोपा बोगामी यांची निर्घृण हत्या महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी होती. शिक्षक ते राजकारणी असा प्रवास करणारे बोगामी यांनी भामरागड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, एटापल्ली, भामरागड पंचायत समिती सभापती, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अशी महत्वाची पदे भूषवली. १० फेब्रुवारी २००२ रोजी जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत्या. स्वतः बोगामी आरेवाडा-नेलगुंडा जिल्हापरिषद क्षेत्रातून उभे होते. दरम्यान प्रचार करून परत येत असताना नक्षल्यांनी लाहेरी जंगल परिसरात त्यांची हत्या केली. यामुळे वातावरण ढवळून निघाले होते. ठिकठिकाणी नक्षल्यांच्या कृत्याचा निषेध करण्यात आला. अनेकांनी या हत्येवर शंका देखील उपस्थित केली होती. यापूर्वीही बोगामी यांना नक्षलवाद्यांकडून धमक्या आल्या होत्या. परंतु त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले. त्याकाळात सक्षम आदिवासी नेतृत्व म्हणून त्यांचा आदर होता. भविष्यातील आमदार म्हणून त्यांच्याकडे बघितल्या जायचे. आदिवासी क्षेत्राचा विकास झाला पाहिजे, क्षेत्रातील प्रश्न मार्गी लागावे यासाठी ते कायम आग्रही होते. परंतु नक्षल्यांना ते मान्य नव्हते. त्यावेळेस नक्षल चळवळ देखील मोठ्या प्रमाणात फोफावली होती. त्यांच्या दहशतीने अनेकांनी राजकारणातून संन्यास घेतला. मात्र, मालू कोपा बोगामी लोकशाही व्यवस्थेवर विश्वास ठेऊन अखेरच्या क्षणापर्यंत कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने सर्वसामान्य आदिवासी नेतृत्वाचा अंत झाल्याची भावना त्यांचे सहकारी बोलून दाखवितात. त्यांच्या पश्चात पत्नी सात मुली व एक मुलगा असा मोठा परिवार आजही त्या भागात विविध क्षेत्रात कार्यरत आहे. मुलगा लक्ष्मीकांत तालुका काँग्रेसचा अध्यक्ष आहे. तर एक मुलगी आरेवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा देत आहे. मधल्या काळात पोलिसांच्या कारवाईमुळे नक्षल्यांच्या हालचाली कमी झाल्या असल्या तरी अधूनमधून नक्षलवादी राजकीय नेत्यांच्या नावे धमकिपत्रे टाकत असतात त्यामुळे दहशत आजही कायम आहे.
हेही वाचा >>>नागपूर विद्यापीठाची निविदा प्रक्रिया वादात; विशिष्ट कंपनीच्या लाभासाठी इतरांना जाचक अटी?
वैद्यकीय अधिकारी म्हणून मुलीकडून सेवा
मालू कोपा बोगामी यांची हत्या झाली तेव्हा त्यांची मुलगी भारती दहावीला होती. वडीलांच्या हत्येने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. या धक्क्यातून सावरत भारतीने मोठ्या संघर्षाने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. काही काळ बाहेर सेवा दिल्यानंतर भारती आपल्या पतीसह आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू झाली. तेथे दोघेही आदिवासींना आरोग्य सेवा देत आहे. ज्या परिसरात वडिलांची हत्या झाली त्याच परिसरात वैद्यकीय सेवा देण्याचे धाडस करणाऱ्या भारतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नक्षलवाद्यांकडून झालेल्या प्रमुख राजकीय नेत्यांची हत्या
मालू कोपा बोगामी हे काँग्रेसचे मोठे नेते होते. १० फेब्रुवारी २००२ ला त्यांची नक्षल्यांनी हत्या केली. यानंतर कोरची येथील काँग्रेस नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. प्यारेलाल अग्रवाल यांची ४ जून २००६ रोजी नक्षल्यांनी हत्या केली. भामरागड पंचायत समिती सभापती बहादुरशहा आलाम यांची २८ जानेवारी २०१२ रोजी नक्षल्यांनी हत्या केली. तर एटापल्ली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते केवल अत्कमवार यांची १३ एप्रिल २०१२ रोजी भर चौकात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ३० मे २०१४ ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा एटापल्ली पंचायत समितीचे माजी उपसभापती घीसू मट्टामी यांची देखील नक्षल्यांनी हत्या केली.