नागपूर: नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्याच्या एक दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते व नागपूरचे माजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत हे नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय परिसरात दिवसभरासाठी साखळी उपोषणावर बसले आहे. येथे सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन देत ते या रुग्णालयाचे बांधकाम तातडीने सुरू करण्याची मागणी करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंदोरा, कामठी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्र परिसरात २६ नोव्हेंबरपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव कृती समितीतर्फे साखळी उपोषण व जनआंदोलन सुरू आहे. आंदोलनाला सातत्याने स्थानिकांचे समर्थन वाढत आहे. आंदोलनस्थळी तरुण, वयोवृद्ध, महिला आणि पुरुषांची सातत्याने गर्दी दिसत आहे. उपस्थितांकडून सातत्याने सरकारच्या रुग्णालयविरोधी भूमिकेवर संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा… केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा गडचिरोली दौरा पुढे ढकलला; कारण काय? जाणून घ्या…

दरम्यान नागपूरचे माजी पालकमंत्री व ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रयत्न करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्राचे श्रेणीवर्धन मंजूर करून घेतले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना डॉ. राऊत यांनी या रुग्णालयासाठी १ हजार १६५ कोटी रुपयांना मंजूरीही मिळवून दिली होती. परंतु हे रुग्णालय इतरत्र पळवण्याचा घाट सुरू असल्याचे सांगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव कृती समितीकडून आंदोलन सुरू आहे. कृती समितीच्या या आंदोलनाला समर्थन दाखवत या रुग्णालयाचे बांधकाम तातडीने सरू करण्याच्या मागणीसाठी बुधवारी डॉ. नितीन राऊत सकाळी साखळी उपोषणावर बसले. याप्रसंगी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने तरुण- तरुणींनीही सहभाग घेतला. दरम्यान आंदोलन स्थळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन करण्यात येणार आहे. सोबत सायंकाळी कॅण्डल मार्चही या ठिकाणाहून काढण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय बचाव कृती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

हेही वाचा… विधानभवन कार्यालयातून शिवसेनेची मशाल गायब; नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे

रुग्णालयाचा प्रवास…

वैद्यकीय शिक्षण खात्याने १५ ऑगस्ट २००४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे काम सुरू केले. तीन टप्प्यात रुग्णालयाचा विकास होणार होता. मात्र, येथे आजही बाह्यरुग्ण विभागाशिवाय (ओपीडी) काहीही नाही. २०१९ मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत येथे पदव्युत्तर व अतिविशेषोपचार अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली. १० मार्च २०२२ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात येथील खर्चाच्या तरतुदीची अर्थसंकल्पात घोषणा केली. परंतु, पुढे काहीच झाले नाही. नवीन प्रस्तावानुसार, रुग्णालयातील ११ अतिविशेषोपचार विभाग आणि त्याच्या अखत्यारित ६१५ रुग्णशय्या राहणार होत्या. येथे १७ विशेषोपचार अभ्यासक्रम, श्रेणीवर्धनासाठी १ हजार १६५ कोटी ६५ लाख रुपये मंजूर होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader nitin raut on hunger strike in nagpur mnb asj
Show comments