अकोला : मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलवी यांना शिवीगाळ करून ॲड. प्रकाश आंबेडकरांविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी काँग्रेस नेते साजिद खान पठाण यांच्यावर अकोल्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बुधवारी विविध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर डाबकी रोड पोलीस ठाण्यात साजिद खान पठाण यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे महानगर महासचिव गजानन गवई यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, साजिद खान पठाण यांनी १० मे रोजी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलवी हाफिज नजीर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. ॲड. प्रकाश आंबेडकरांना मतदान करण्याचे आवाहन का केले? या कारणावरून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. सोबतच ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द बोलून मौलवी यांना भ्रमणध्वनीवरून धमक्या दिल्याचे  तक्रारीत नमूद आहे. साजिद खान यांच्या संभाषणाची  ध्वनिफित समाजमाध्यमातून प्रसारित झाली. साजिद खान पठाण यांनी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या अगोदर देखील त्यांनी मौलवींची बदनामी केल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन साजिद खान पठाण यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी केली. या संदर्भातील तक्रार वंचित आघाडीने शहर कोतवाली, जुने शहर, डाबकी रोड, अकोट फैल पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली. गजानन गवई यांच्या तक्रारीवरून डाबकी रोड पोलिसांनी काँग्रेस नेते साजिद खान पठाण यांच्यावर भादंवि कलम १५३ अ, १२० ब, २९५ अ व ५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

guardian minister post Raigad District BJP shiv sena NCP Eknath Shinde Aditi Tatkare Bharat Gogawle
रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असताना भाजपची नवी खेळी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
What Rahul Solapurkar Said?
Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकरांनी भांडारकर संस्थेचं विश्वस्तपद सोडलं, शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्यावरील माफीनाम्यानंतर राजीनामा
beed politics Devendra Fadnavis Suresh Dhas pankaja munde dhananjay munde
माध्यमांमध्ये ‘ आवाज’ बनलेल्या सुरेश धस यांच्या पाठिशी देवेंद्र फडणवीस
MLA Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “आणखी बऱ्याच जणांवर मकोका लागायचाय”, सुरेश धसांचा मोठा इशारा; म्हणाले, “बीडमध्ये अजून…”
Image Of Devendra Fadnavis And Eknath Shinde
Devendra Fadnavis : “आता फडणवीस त्याचे उट्टे काढत आहेत”, ठाकरेंच्या खासदाराचे शिंदे-फडणवीस यांच्याबाबत खळबळजनक दावे
devendra bhuyar marathi news
अजित पवारांच्या पक्षाचा माजी आमदार म्हणतो, “अर्थसंकल्प भ्रमनिराश करणारा!”
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!

हेही वाचा >>>संस्थापक-शिक्षकाच्या वादात लिपीकाची हत्या; गोंदियातील सिद्धार्थ विज्ञान महाविद्यालयातील घटना

दरम्यान, या प्रकरणाला लोकसभा निवडणुकीची किनार आहे. साजिद खान पठाण यांच्यावर दंगलीचे देखील गुन्हे दाखल आहेत. २०१९ मध्ये त्यांनी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटवर निवडणूक लढत भाजपला कडवी झुंज दिली होती. काँग्रेसने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवत २०२४ मध्ये पोटनिवडणुकीत उमेदवारी देखील जाहीर केली होती. मात्र ही पोटनिवडणूक उच्च न्यायालयाच्या आदेशाने रद्द करण्यात आली. यंदा अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील व वंचित आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत झाली. अकोला मतदारसंघात मुस्लिमांचे १७ ते १८ टक्के गठ्ठा मतदान आहे. त्यामुळे मुस्लिमांची मते निर्णायक होती. काँग्रेस व वंचितच्या दृष्टीने मुस्लिमांची मते केंद्रस्थानी होती. दोन्ही पक्षामध्ये मुस्लिम मतांसाठी चढाओढ लागली होती. मुस्लिम मतपेढी कायम ठेऊन इतर मते मिळवण्यासाठी काँग्रेसने अतोनात प्रयत्न केले, तर मुस्लिमांची गठ्ठा मते मिळविण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी देखील प्रतिष्ठा पणाला लावली होती. निवडणुकीनंतर मुस्लिम मतांचा कल कुणाकडे राहिला, यावरून वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. ४ जूनला होणाऱ्या मतमोजणीनंतरच ते स्पष्ट होईल. निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया पार पडली असली तरी मुस्लिम मतांवरून काँग्रेस व वंचितमधील वाद पेटत असल्याचे दिसून येते.

Story img Loader