नागपूर : देशाची परिस्थिती बिघडत चालली आहे. प्रतिमा उंचावण्याच्या नादात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा यांनी संघालाही गुंडाळून ठेवले आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते शिवाजीराव मोघे यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रेसक्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मोघे म्हणाले, पंतप्रधानपदी वाजपेयी असताना सामाजिक एक्य कायम होते. परंतु, मोदी आल्यापासून देशातील सामाजिक, धार्मिक स्थिती बिघडली आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच पैशांच्या जोरावर बहुमतातील सरकार पाडले जाते. छोटे पक्ष संपविले जातात. विरोधी पक्षाच्या नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा लावला जातो. एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याला दोन वर्षांची शिक्षा दिली जाते. लगेच त्यांचे सदस्यत्व रद्द केले जाते. यातून देशात हुकुमशाही आणण्याचा डाव भाजपचा आहे, असा गंभीर आरोपही मोघे यांनी केला. भाजपच्या विरोधात काँग्रेसच्या ओबीसी, एस.सी., एस.टी, व अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने संयुक्त निषेध आंदोलन शनिवार १ एप्रिल रोजी संविधान चौकात केले. त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.

हेही वाचा – पवार म्हणतात, “सावरकर हा राष्ट्रीय मुद्दा नाही”; विरोधी पक्षाला वाद टाळण्याचा सल्ला

हेही वाचा – ‘आरटीओ’ लाच प्रकरण: लाचखोर खोडेचे मंत्रालयापर्यंत धागेदोरे; खाडे, बुंदेलेंच्या संपर्कात?

याप्रसंगी नामदेव उसेंडी, गोविंद भांडारकर, वसीम खान, राहुल घरडे, फजल रहमान, प्रदीप मसराम, दशरथ मडावी, संजय दुधे उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader shivajirao moghe made serious allegations against pm modi and bjp mnb 82 ssb