१६ एप्रिलला नागपुरात सभा

जिल्ह्यात काँग्रेसने जिल्हा परिषद, पदवीधर, शिक्षक मतदारसंघात भाजपला धूळ चारली आहे. सर्वत्र हरल्यावरही नागपूर जिल्हा भाजपचा गड कसा, असा सवाल माजी मंत्री व काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी महाविकास आघाडीतर्फे केला. महाविकास आघाडीची संभाजीनगर येथे रविवारी पहिली सभा झाली. दुसरी सभा १६ एप्रिलला नागपुरात होत आहे. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी के.डी.के. महाविद्यालयात सोमवारी बैठक झाली. या बैठकीला महाविकास विकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते. यात जाहीर सभा नंदनवन येथील दर्शन कॉलनी मैदानात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नागपूर : संभाजीनगरची सभा म्हणजे शिल्लक सेनेची बोंबाबोंब – बावनकुळे यांची टीका

सभेचे मुख्य संयोजक म्हणून माजी मंत्री सुनील केदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बैठकीनंतर केदार यांना भाजपच्या गडात महाविकास आघाडीची जाहीर सभा होत असल्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी सलग पराभवानंतरही नागपूर भाजपचा गड कसा, असा प्रतिसवाल केला. ही सभा म्हणजे शक्तीप्रदर्शन नाही. लोकांचे महाविकास आघाडीवर किती प्रेम आहे, हे दाखवण्यासाठी ही सभा आहे. त्यामुळे कोणालाही लोक जमवण्यासाठी लक्ष्य ठरवून देण्याचा प्रश्नच येत नाही, असेही केदार म्हणाले.

हेही वाचा >>> ‘गांधी’विरोधी सावरकर गौरव यात्रेचा प्रारंभ आणि समारोप ‘गांधी’ चौकातच; यात्रेसाठी ‘गांधीं’चाच आधार घेत असल्याच्या चर्चा

‘नपुंसक’ सरकारवर गोमूत्र शिंपडण्याची वेळ महाराष्ट्रात भाजपच्या यात्रेला प्रतिसाद मिळत नाही म्हणून गोमूत्र शिंपडून प्रकाशझोतात राहण्याची नवी क्लृप्ती या पक्षाने शोधून काढली आहे. सत्ता हातातून निसटत असल्याचे दिसू लागले की गोमूत्र, गाय, सावरकर आठवतात. सत्ताधारी असे प्रयोग करतील, पण लोकांनी बदलाचा निर्णय पक्का केला आहे. न्यायालयानेही सरकारला ‘नपुंसक’ म्हटले आहे, अशी टीका माजी मंत्री व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader sunil kedar hit bjp over savarkar issue rbt
Show comments