नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यासह १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यातच अजीत पवार हे राष्ट्रवादीत बंडखोरी करून सत्तेत सहभागी झाले. तेव्हापासून अजीत पवार यांना मुख्यमंत्रीपदाचे आमिष भाजपने दाखवले आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप व अजीत पवार यांच्याबाबत वेगळच वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा : शेगावात पन्नास हजारांवर भाविक! साप्ताहिक सुट्या व एकादशीचा योग; भाविकांमुळे विदर्भ पंढरी फुलली

Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
Fear of division in Teli community due to the candidates given by sharad pawar and ajit pawar
पवार काका पुतण्यांनी दिलेल्या उमेदवारांमुळे तेली समाजात फूट पडण्याची भीती
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?

ते आज नागपुरात त्यांच्या निवासस्थानी बोलत होते. राज्यातील विद्यमान सरकारबाबत ते म्हणाले, ‘बैल गाडी एकाची, बैल दुसऱ्याचा आणि हाकणारा तिसराच आहे. यामुळे कुणाची लॅाटरी लागेल माहीत नाही. शरद पवार भाजपसोबत आल्याशिवाय अजितदादांना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही. ही भाजपची अट आहे’, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.