रवींद्र जुनारकर लोकसत्ता

चंद्रपूर:लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारमध्ये सहभागी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार, माजी खासदार नरेश पुगलिया, शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप, श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्ष ॲड.पारोमिता गोस्वामी नेमकी काय भूमिका घेतात, कुणाच्या मागे पाठबळ उभे करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात पहिल्याच टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान आहे. भाजपाने वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे. मुनगंटीवार यांचा प्रचारही सुरू झाला आहे. तर कॉग्रेसमध्ये विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार व आमदार प्रतिभा धानोरकर यांचा एकमेकांची उमेदवारी कापण्यासाठी दिल्लीत संघर्ष सुरू आहे. त्यामुळे उमेदवारीच्या मुद्यावर कॉग्रेस पक्षात गोंधळाचे वातावरण आहे. अशातच या लोकसभा मतदार संघात मतदारांवर वर्चस्व ठेवून असलेले व महायुती सरकारमध्ये सहभागी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जोरगेवार ७५ हजारांपेक्षा अधिक मतांची आघाडी घेवून विजयी झाले होते.

BJP workers waited four hours for Priyanka Gandhis road show
नवलचं! प्रियंका गांधींच्या ‘रोड-शो’साठी भाजपचे कार्यकर्ते चार तास प्रतीक्षेत का होते?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
In Tiroda Goregaon Mahavikas Aghadi candidate Ravikant Bopches campaign van vandalized
राष्ट्रवादीचे उमेदवार रविकांत बोपचे यांच्या प्रचार गाडीची तोडफोड
rahul gandhi rally in gondia maha vikas aghadi
Gondia Assembly Election 2024 : गोंदियातील राहुल गांधींची सभा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तारणार?
Rights and Duties of the Opposition in democracy
चतु:सूत्र : लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
Devendra Fadnavis applauded by Narendra Modi Amit Shah print politics news
मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत

हेही वाचा >>> नरेंद्र मोदी, अमित शहांमध्ये औरंगजेबी वृत्ती; उद्धव ठाकरेंचा घणाघात, म्हणाले ‘यंदा देशात परिवर्तन अटळ’

यंग चांदा ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून चंद्रपूर विधानसभा मतदार संघात त्यांचे प्राबल्य आहे. तसेच महिला वर्गात जोरगेवार यांची लोकप्रियता आहे. स्थानिक पातळीवर मुनगंटीवार यांच्याशी मतभेद असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापासून भाजपाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे जोरगेवार लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांच्या बाजूने उभे राहतात की वेगळी भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. जोरगेवार यांच्याशी काही दिवसांपूर्वी यासंदर्भात बोलणे झाले असता भाजपचे मुनगंटीवार किेवा कॉग्रेसच्या इच्छुक उमेदवारांकडून अद्याप फोन आलेला नाही असे ते म्हणाले होते.  कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया विदर्भ किसान मजदूर कॉग्रेसच्या माध्यमातून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय आहेत. बल्लारपूर पेपर मिल युनियन तसेच जिल्ह्यातील सर्व सिमेंट कारखाने, एमईएल व कोळसा खाणीत पुगलियांच्या कामगार संघटनांचे वर्चस्व आहे. कोणाला निवडून आणायचे आणि कोणाला पाडायचे किमान इतकी शक्ती आजही पुगलियांमध्ये आहे. महापालिकेतही त्यांचे नगरसेवक सक्रीय आहेत.

हेही वाचा >>> “वीज कर्मचाऱ्यांना पेंशन नकारणाऱ्या सरकारला लोकसभेत मतदान नाही,” कोणत्या संघटनेने केली घोषणा? वाचा…

लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात पुगलियांचे कार्यकर्ते व त्यांना मानणारा एक विशिष्ट मतदार आहे. तसेच दाताळा मार्गावरील तिरूपती बालाजी मंदिराच्या ब्रम्होत्सव कार्यक्रमात पुगलियांनी वन मंत्री मुनगंटीवार यांना लोकसभेत जाण्यासाठी आशिर्वाद दिला होता. त्यामुळे पुगलियांची भूमिका काय राहणार ते ही बघण्यासारखे आहे. दारूबंदी आंदोलन यशस्वीकरून दाखविणाऱ्या श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्षा ॲड.पारोमिता गोस्वामी यांच्या संघटनेचे काम जिल्ह्यात मोठे आहे. जिवती, कोरपना, राजुरा या भागातील आदिवासी, कोलाम समाज ॲड.पारोमिता यांना मानतो, तसेच मूल, पोंभूर्णा, गोंडपिंपरी या ग्रामीण भागासह चंद्रपूर शहरात देखील त्यांचे कार्यकर्ते सक्रीय आहेत. ॲड.गोस्वामी यांच्या आंदोलनाची दखल घेवूनच मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हा दारूबंदीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गोस्वामी यांना मुनगंटीवारांबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या विरोधात उघड भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र अद्याप पर्यंत कॉग्रेस उमेदवार ठरलेला नाही. तेव्हा ॲड. गोस्वामी कोणाच्या पाठीशी उभ्या राहतात याकडेही सर्वांचे लक्ष आहे. विशेष म्हणजे ॲड.गोस्वामी यांनी आम आदमी पक्षाकडून २०१९ मध्ये ब्रम्हपुरी विधानसभा मतदार संघातून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात निवडणुक लढविली होती. मात्र आज ॲड.गोस्वमी राजकारणापासून दूर आहेत. जनविकास सेनेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक पप्पू देशमुख काय निर्णय घेतात हे ही बघण्यासारखे आहे, पर्यावरण क्षेत्रात काम करणारे बंडू धोतरे यांनी निर्भय बनो सभेचे आयोजन करून भाजपच्या विरोधात भूमिका घेतली आहे. तर बहुसंख्य पर्यावरणवादी व वन्यजीव अभ्यासक मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थही समोर आले आहेत. असे असले तरी समाजात वर्चस्व असलेल्या या सर्वांच्या राजकीय भूमिकांकडे मतदार लक्ष ठेवून आहेत.