नागपूर : काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्र महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून काही संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या संघटनांच्या म्हणण्यानुसार वडेट्टीवार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे, त्यामुळे त्यांनी माफी मागायला हवी. पण, वडेट्टीवार यांनी असे कोणते वादग्रस्त विधान केले हे आपण बघूया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वडेट्टीवार यांनी तीन दिवसापूर्वी मुंबईत एका मराठी वृत्तवाहिनीला बाईट दिली. भाजपने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक साधू-संतामुळे जिंकली, असा दावा नरेंद्र महाराज यांनी केला आहे, याविषयीचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले, “नरेंद्र महाराज याला कुठले दिव्य स्वप्न पडले माहिती नाही. राज्यात साधू-संतामुळे ही निवडणूक जिंकली म्हणणे म्हणजे महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान आहे. कारण, त्याला धार्मिक स्वरुप देऊन ध्रुवीकरण करत असतील तर ते साधू-संत नाहीत. संताची शिकवण सर्व समाजाला एकत्र घेऊन समाजाची उन्नती, प्रगती साधणे आणि समाज घडवणे असतो.”

आता वक्तव्यावरून महाराष्ट्रातील मंत्री आणि काही संघटना आक्रमक झाल्या आहेत. एवढेच नव्हेतर काही संघटनांनी वडेट्टीवार यांना इशाराही दिला आहे. या वक्तव्याच्या विरोधात मुंबई, पुणे, नागपूसह राज्यातील अनेक भागात काही संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

वडेट्टीवार यांच्या निषेध केल्या जात आहे. नरेंद्र महाराजांच्या अनुयायांनी आणि भक्तांनी रस्तावर उतरत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यावेळी विजय वडेट्टीवार यांचा कडाडून निषेध नोंदवत त्यांनी माफी मागावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

माफी मागावी अन्यथा परिणामाला समोर जावे

विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात नाशिकमध्ये जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. नरेंद्रचार्य महाराज यांच्या भक्तांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यलयासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे. वडेट्टीवार यांनी नरेंद्रचार्य महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे भक्त आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहे. वडेट्टीवार यांच्या फोटोला जोडे मारून हे आंदोलन करण्यात आले आहे. तर वडेट्टीवार यांनी माफी मागावी अन्यथा परिणामाला समोर जावे असा इशारा या आंदोलकांनी यावेळी दिला आहे.

जोडे मारो आंदोलन

नरेंद्र महाराज यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ त्यांच्या संतप्त शिष्यगणांनी पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला केले जोडे मारो आंदोलन केले.

हा शब्दप्रयोग आला कुठून?

वांगी ही एक अस्सल भारतीय भाजी. संस्कृतात तिला वंगन: म्हटले आहे व त्यावरूनच बैंगन हे नाव ‘व’चा ‘ब’ होऊन अन्य भारतीय भाषांत गेले असावे. पण कुठल्याही पुराणात वांगी हा प्रकार नोंदलेला नाही. मग ‘पुराणातली वांगी’ हा काय प्रकार आहे? मुळात तो शब्द ‘वांगी’ नसून ‘वानगी’ म्हणजेच ‘उदाहरण’ असा आहे. पण उच्चार करताना ‘वानगी’ शब्दाचा ‘वांगी’ हा चुकीचा उच्चार रूढ झाला आणि ‘पुराणातली वांगी’ हा विचित्र शब्दप्रयोग जन्मास आला. ऐतिहासिक कारणांतून अनेक शब्दप्रयोग भाषेत आले आहे.