अमरावती : राज्यातील दुष्काळी परिस्थितीची भीषणता पाहता राज्यातील वेगवेगळ्या भागात जाऊन दुष्काळाची पाहणी करून सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहे, यावर नजर ठेवण्यासाठी काँग्रेसने विभागनिहाय दुष्काळ पाहणी समिती स्थापन केली आहे. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर या अमरावती विभागातील दुष्काळ पाहणी समितीच्या अध्यक्ष आहेत.
ही समिती दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून विभागीय आयुक्तांना व प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करणार आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार व प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनेवरून विभागवार जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.
राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे, पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्यांची मोठी समस्या असून रोजगारही मिळत नाहीत. हंडाभर पाण्यासाठी महिलांना तीन ते चार किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. चारा नसल्यामुळे जनावरे विकावी लागत आहेत. फळबागा करपून गेल्या आहेत. अनेक शहरांना १५ दिवसांनी पाणी मिळत आहे. पाण्याचे टँकर अपुरे आहेत. रोजगार हमीची कामे, चारा छावण्या अद्याप सुरू नाहीत. राज्यातील सरकारला दुष्काळाची चिंता नाही. जनता दुष्काळाने होरपळतअसताना महायुती राजकीय साठमारीत व्यस्त आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
हेही वाचा >>>करचोरीला आवताण! ‘सीजीएसटी’मध्ये रिक्त पदांचा आलेख वाढला
अमरावती विभागाच्या समितीप्रमुख या आमदार यशोमती ठाकूर असून आमदार अमित झनक, आमदार बळवंत वानखडे, आमदार राजेश एकडे, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, आमदार धीरज लिंगाडे हे या समितीचे सदस्य आहेत, तर काँग्रेसचे प्रवक्ते अॅड दिलीप एडतकर हे समितीचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. ही समिती शेतकऱ्यांसोबत चर्चा करून परिस्थिती जाणून घेणार आहे.
अमरावती विभागातील परिस्थिती भीषण असून पाणीटंचाईसोबतच शेतकऱ्यांना बियाणे टंचाईचा देखील सामना करावा लागत आहे. बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी मंगळवारी अकोल्यात रास्ता रोको केले. जिल्ह्यात एकीकडे जमावबंदी लागू असताना भर उन्हात शेतकरी बियाण्यांसाठी रांगेत उभे राहतात, हे चित्र दुर्देवी आहे. विभागात टँकरग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होत असताना सरकार तात्पुरती मलमपट्टी करण्यात व्यस्त आहे. यंत्रणा ढिम्म आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीविषयी जनतेसमोर सत्य समोर यावे हा उद्देश आहे. आमदार यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात अमरावती विभागात लवकरच पाहणी दौरा सुरू करून अहवाल तयार केला जाणार आहे, अशी माहिती समितीचे समन्वयक दिलीप एडतकर यांनी दिली. केवळ दिखावा म्हणून कारवाई ?
हेही वाचा >>>सावधान: अमरावतीत सायबर गुन्हेगारी फोफावली, सर्वसामान्यांसह उच्चशिक्षितांनाही फटका; पंधरवड्यात तब्बल…
ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, ग्रामीण पट्ट्यात महामार्गालगत मोठ्याप्रमाणात बेकायदा ढाबे उभारण्यात आले आहेत. या ढाब्यांवर रात्री उशीरापर्यंत अल्पवयीन मुले, परवाना नसलेल्या ग्राहकांना मद्य पुरविले जाते. रात्री उशीरापर्यंत मद्याच्या पार्ट्या सुरू असतात. महामार्गालगत हा प्रकार घडत आहे. त्यामुळे पुण्याप्रमाणे ठाण्यातही एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या ढाब्यांवर होणाऱ्या मद्याच्या विक्रीवर लगाम केव्हा लागेल असा प्रश्न विचारला जात आहे.
या हाॅटेलवर कारवाई
१) मे. यल्लो बनाना फुड कंपनी ( चितळसर मानपाडा, घोडबंदर, ठाणे )
२) मे. क्रेझी बार (नेरूळ, नवी मुंबई)
३) मे. हाॅटेल साईराज (भिवंडी, रांजनोली)
४) मे. गणेशकृपा रेस्टाॅरंट (मानपाडा, डोंबिवली)
५) मे. हाॅटेल गिरीश (एमआयडीसी, डोंबिवली)
६) मे. हाॅटेल सरगम (नारपोली, भिवंडी)
७) मे. हाॅटेल इंडिगो स्पाईस इंकयार्ड (जीएनपी गॅलेरिया, डोंबिवली)
८) मे. डासिंग बाॅटल ( सेक्शन १७, उल्हासनगर)
९) मे. पारो रेस्टाॅरंट अँड बार (रांजनोली, भिवंडी)
१०) हाॅटेल साई सिद्धी (शिळफाटा, डोंबिवली)
११) हाॅटेल गोपाळाश्रम (वागळे इस्टेट, ठाणे)