काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार आणि राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वात नागपुरात आंदोलन झाले. जिल्हा परिषद उपाध्यक्षच्या शासकीय निवास स्थानाजवळ शिंदे- भाजप सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.जिल्हा परिषदेत कॉंग्रेसची सत्ता आहे, तरी दोन माजी मंत्री आणि जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आंदोलन करीत आहेत.
जिल्हा परिषदेच्या विकास योजनांनाच्या ७०० कोटींच्या निधीस स्थगिती देऊन महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागातील जनतेवर अन्याय केला.या विरोधात आंदोलन असल्याचे सुनील केदार यांनी सांगितले.महाविकास आघाडी सरकारने नागपूर जिल्ह्यातील विकास कामासाठी ७०० कोटी मंजूर केले. पण धोकेबाजी करून सत्तेत आलेले बेकायदेशीर सरकारने विकास कामांना स्थगिती दिली आहे. असे,राजेंद्र मुळक म्हणाले.