लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर : काँग्रेसने शहरातील सर्व सहाही विधानसभा मतदासंघात लोकसंवाद पदयात्रा काढण्यास सुरुवात केली आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदासंघात पदयात्रा काढून लोकांशी संवाद साधला. या पदयात्रेचे नेतृत्व आमदार विकास ठाकरे यांनी केले.
आणखी वाचा-आमदाराकडे जाऊन थकले; गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून बांधला रस्ता, गडचिरोलीतील दुर्गम भागात विदारक स्थिती
या पदयात्रेला ब्लॉक क्र.७ अध्यक्ष पंकज थोरात व ब्लॉक क्र. ९ चे अध्यक्ष पंकज निघोट यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी पदचात्रेचे नियोजन केले. पदयात्रेला सुभाष नगर येथून सुरुवात झाली. सर्वप्रथम माटे चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला माल्यार्पण करण्यता आले. तेथून निघाल्यानंतर लक्ष्मीनगर चौकात नागरिकांनी पुष्पगुच्छाने स्वागत केले. पदयात्रेचे समापन दिक्षाभूमी येथे झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे घेतले होते. लोकसंवाद यात्रेचे पत्रके ते वाटत होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते “डरो मत निर्भय बनो’ असे लोकांना आवाहन करीत होते. तसेच “राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. पदयात्रा मध्ये रथावर राहुल गांधीचे पोस्टर होते.