नागपूर: बीडमध्ये मोठा उद्रेक होऊन जाईल, पोलीस किंवा गृह खात्याचा काय अहवाल आहे माहीत नाही, मात्र ज्यावेळेस एखादी मोठी घटना होईल त्यावेळी हजारो लोकांना आपला जीव गमावा लागेल, अशी शंका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

नागपुरातील निवासस्थानी ते माध्यमांशी बोलत होते. वडेट्टीवार पुढे म्हणाले, मराठा विरूद् ओबीसी असा बीडचा राजकारण झाले आहे. शाळांमधून मुले काढण्याचे काम सुरू आहे. मराठवाड्यात मराठ्यांची शाळा असली तर ओबीसींचे मुले नाव काढत आहेत,  ओबीसींची असल्यास मराठा मुले नाव काढत आहेत, हे जे चाललेय ते भयानक आहे. राजकीय वाद सामाजिक स्तरावर गेलेला आहे. सरकारला कायदा सुव्यवस्थेचे देणे घेणं राहिले नाही. आपल्या माणसाला मदत करा, महाराष्ट्रातील बीड किंवा दोन- तीन जिल्ह्यात आता इतका टोकाचे वातावरण दोन्ही समाजात दिसत आहे. सरकारचे लक्ष नाही. हा उद्रेक महाराष्ट्राच्या हिताचा नाही आणि पुरोगामी विचाराच्या दृष्टीने उद्या अत्यंत भयानक  होण्याची शक्यताही वडेट्टीवार यांनी वतर्वली. सरकार बीडची परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरले आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्रात काय चाललेला आहे, कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिले नाही आणि कायद्याचा भाग राहिला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

औरंगजेबच्या कबरेबाबत….

औरंगजेब कोण होता, कसा होता हे सगळ्यांना माहित आहे. ज्यांनी स्वतःच्या बाप भावाला सोडले नाही अशी प्रवृत्ती औरंगाबादची होती. त्याने सत्तेसाठी कुठलीही दयामाया दाखवले नाही. या क्रूर व्यक्तीच्या नावाला कोणी समर्थन देणार नाही. मात्र कबरेच्या संदर्भात जो निर्णय आहे, तो पुरातत्त्व विभागाकडे ही कबर आहे, ते सरकारने योग्य निर्णय घ्यावा एवढेच भूमिका आहे. औरंगजेबाची नावाखाली धर्मांधता पसरवणे, हिंदू मुस्लिम वाद पसरवणे योग्य नाही, बहुतांश मुस्लिम हे शिवाजी महाराजांसोबत होते. औरंगजेब ही प्रवृत्ती होती, त्याला धार्मिक दृष्टिकोनातून बघता कामा नये, औरंगजेब धर्मवेडाच होता, त्याचा काळा इतिहासच आहे, अशा व्यक्तीची कबर महाराष्ट्रात आहे तर या संदर्भात उदयनराजेंनी काही म्हटल असेल तर सरकारने त्याबाबत निर्णय घ्यावा, असेही वडेट्टीवार म्हणाले.

गुटखाच्या अवैध प्रकरणाशी अनेकांचे धागेदोरे…

राज्यात गुटका बंदी आहे मात्र गुटखा येतोच. या प्रकरणाशी अनेकांचे धागेदोरे जुडलेले आहेत. अनेक लोक सत्तेमधील सरकारच्या इशाऱ्यावर हे सगळे करत आहे. राज्यात भेसळ मोठ्या प्रमाणात असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

उच्च न्यायालयाच्या नोटीसीवर म्हणाले…

नारायण जांभुळे यांनी निवडणुकीचा अर्ज भरला त्यावेळी विषयी तक्रार केली होती. माझ्या पत्नीच्या नावे स्टॅम्प पेपर होता. त्यावेळी उच्च न्यायालयात गेले होते. परंतु न्यायालयाने याचिका फेटाळली होती. आता त्यांनी पुन्हा याचिका टाकली आहे. त्याबाबतच्या नोटीसीला वकिलांचा सल्ला घेऊन पून्हा उत्तर देऊ. त्यात फारसे काही तथ्य नाही, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.