चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काँग्रेसमध्ये आयारामांचा लोंढा वाढला असून निष्ठावंतांमध्ये प्रचंड अस्वस्थतता दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे काँग्रेस पक्षात आयारामांची संख्या वाढली आहे. परिणामी निष्ठावंतांची विधानसभा उमेदवारीत नावे मागे पडत आहेत. राज्य आणि केंद्रीय नेत्यांकडून आयारामांना बळ मिळत असल्याने आम्ही आयुष्यभर सतरंज्यांच उचलायच्या का, असा प्रश्न निष्ठावंत विचारताहेत.

अनुसूचित जातीसाठी आरक्षित चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी म्हणून निष्ठावंत धडपड करीत आहेत. मात्र, काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे राजु झोडे यांना स्थानिक नेत्यांनी आशीर्वाद दिला आहे. यामुळे झोडे यांनी थेट शहरात कार्यालय सुरू केले. डॉ. दिलीप कांबळे यांचा काँग्रेस पक्षाशी तसा संबंध नाही, मात्र त्यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपचे एक माजी नगसेवकदेखील काँग्रेसने उमेदवारी दिली तर विधानसभा लढण्याच्या तयारीत आहेत. वादग्रस्त सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुधाकर अंभोरे काँग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रयत्नरत आहेत. इंजि. गौतम नागदेवते देखील स्पर्धेत आहेत. या सर्वांचा काँग्रेस पक्षाशी काय संबंध, असा प्रश्न निष्ठावंतांच्या वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.

Imtiaz Jalil will contest assembly elections from Aurangabad East
इम्तियाज जलील औरंगाबाद पूर्व मधून निवडणुकीच्या रिंगणात
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
pune city reasons to avoid firecrackers noise pollution during Diwali pune
कर्णसुखद की नेत्रसुखद!
Diwali festival sale of eco friendly sky lanterns in the market Pune news
पर्यावरणपूरक आकाशकंदिलांचा झगमगाट
Ajit Pawar, Niphad assembly constituency, election 2024
अजित पवार गटाकडून ‘निफाड’ मतदारसंघातील रहस्य कायम
three savarkar brothers wife information
नाट्यरंग : ‘त्या तिघी’ हिमालयाच्या सावल्यांची खडतर आयुष्यं
Heavy rain returns in Kolhapur district Kolhapur news
पावसाचा मुक्काम हटेना; कोल्हापुरात नारंगी इशारा
Sillod Assembly constituency
सिल्लोड विधानसभा मतदारसंघ : अब्दुल सत्तार विजयाचा चौकार मारणार? काय आहेत त्यांच्यापुढील आव्हानं?

हेही वाचा…वर्धा : चहा, नाश्त्याच्या नावे शासकीय तिजोरीवर डल्ला, गुन्हा दाखल होताच आरोपी अधिकाऱ्याची…

याशिवाय, काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपले मामा आहेत, असे सांगून त्या प्रचारात गुंतल्या आहेत. डॉ. संजय घाटेदेखील उमेदवारीची अपेक्षा करीत आहेत. बंडू धोतरे यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि बल्लारपूरातून उमेदवार मागितली आहे. डॉ. विश्वास झाडेदेखील सक्रिय झाले आहेत. युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे बल्लारपुरातून इच्छुक आहेत. भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी वरोरा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मागितली आहे. याशिवाय प्रा. विजय बदखल व डॉ. चेतन खुटेमाटे हेदेखील उमेदवारीसाठी प्रयत्नरत आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांनीही उमेदवारी मागितली आहे. काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित झालेले डॉ. विजय देवतळे यांनीसुद्धा वरोरा विधानसभेतून उमेदवारी मागितली आहे.

हेही वाचा…आमदार देवेंद्र भुयार यांची ‘लाडक्या बहिणीं’वर दादागिरी; भाजप नेत्याचा गंभीर आरोप

‘…तर विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका!’

आयारामांकडून उमेदवारीसाठी सुरू असलेले प्रयत्न आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आयारामांना दिलेली संधी व आश्वासने, यामुळे काँग्रेसचे निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. हे निष्ठावंत उमेदवारी वाटपात अन्याय झाला तर विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी चर्चा आहे.