महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार असंवैधानिक आहे. या सरकारमधील शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रेच्या प्रकरणावर १४ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. या दिवशी १६ आमदार अपात्र ठरून सरकार कोसळेल, अशी भविष्यवाणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी शनिवारी केली.

हेही वाचा >>> धक्कादायक…! जिल्हा परिषद शाळेतील अकरा विद्यार्थ्यांना ‘ब्रॉयलर चिकन’ खाल्ल्याने विषबाधा

Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
Eknath shinde, shiv sena role, Airoli, belapur assembly election
ऐरोलीतील बंडखोरांना शिंदे गटाचे अभय? बेलापुरात कारवाई, ऐरोलीत आस्ते कदम
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Eknath Shinde, Eknath Shinde comment on Mahavikas Aghadi, Mehkar,
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, “धनुष्य चोरायला ते काही खेळणं आहे का? लाडक्या बहिणींना एकविसशे रुपये…”
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यासाठी ते अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी प्रचारमाध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रात चाललेले शिंदे आणि फडणवीसांचे सरकारच असंवैधानिक आहे. सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. १४ फेब्रुवारीला त्यावर सुनावणी होईल. आम्हाला वाटते की त्या दिवशी निकाल लागेल. ते १६ आमदार अपात्र ठरतील. न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असे आ. पटोले म्हणाले.

सरकार शिवजयंतीदेखील पाहणार नाही – आ. मिटकरी

१९ फेब्रुवारीला येणारी शिवजयंतीदेखील राज्य सरकार पाहणार नाही, याचा आम्हाला विश्वास आहे, असे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले. १९ फेब्रुवारीपूर्वी महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीसांचे सरकार कोसळेल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांनी सांगितल्याप्रमाणे हे सरकार औटघटकेचे ठरेल, असे आ. मिटकरी म्हणाले.