नागपूर: ‘राज्यात गुंडांना संरक्षण देण्याचे काम मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सुरू आहे. महाराष्ट्राच्या जनतेने याचा विचार करावा,’ अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. नितीन राऊत यांनी शनिवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सरकारवर केली.

हेही वाचा : संजय राऊत रेकीवर मंत्री नितेश राणे यांचे मोठे विधान…म्हणाले मच्छर…

बीड आणि परभणी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी घेतलेली गोलगोल भूमिका फसविणारी आहे. आंबेडकरी आंदोलन आणि दलित समाजाची दिशाभूल करणारी भूमिका आहे. राज्यात गुंडांना संरक्षण देण्याचे काम मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सुरू आहे. महाराष्ट्राच्या जनतेने याचा विचार करावा. सहा दिवसांच्या या अधिवेशनामुळे विदर्भाच्या जनतेला न्याय मिळाला नाही, असेदेखील डॉ. नितीन राऊत म्हणाले. निवडणूक आयोग सरकारच्या हाताखालचे बाहुले बनले असल्याचे सांगत राऊत म्हणाले,‘विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले यश ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा परिणाम आहे की निवडणूक आयोगाचे काम आहे, हे सांगता येणार आहे.’

Story img Loader