ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी बुकिंगमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहे. याबाबत लेखी माहिती विचारली असता अधिकारी उत्तर देण्यास टाळाटाळ करीत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्राच्या काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभेत केली. या मागणीमुळे ताडोबाची सफारी बुकिंग पुन्हा एकदा वादात अडकली आहे.
आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभेत चर्चेत सहभाग घेताना ताडोबा व्यवस्थापनाच्या एकूणच कामाच्या पद्धतीवर टीका केली. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील ३० टक्के महसूल राज्य सरकारला मिळतो. त्या निधीतून किती व्याघ्र प्रकल्पाचा विकास करण्यात आला. तसेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना पत्राद्वारे केलेल्या विचारणांचे उत्तर देखील देण्यास टाळाटाळ होत असून ही अक्षम्य बाब असल्याचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सभागृहात म्हटले. येथील सफारी बुकिंगमध्ये देखील प्रचंड घोळ असून त्याची चौकशी करावी तसेच सेवानिवृत्त मात्र कंत्राटी पद्धतीने कार्यरत गुंडावार यांच्या अरेरावी वागणुकीमुळे त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी सभागृहात केली.
महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यापासून महाराष्ट्रातील शेतकरी, कर्मचारी, कष्टकरी, सर्वसामान्य जनता मागील ६ महिन्यापासून त्रस्त आहे. या काळात महापुरुषाचे अपमान संपूर्ण देश बघत आहे. राज्याच्या सर्वोच्च पदावर असणारी व्यक्ती शिवराय, महात्मा फुले, सावित्री फुले यांचा अवमान करीत आहे. या घटना लज्जास्पद असल्याचे म्हटले. महापुरुषांचा अवमान थांबवण्यासाठी आणि सन्मान मिळवून देण्यासाठी महात्मा फुले, सावित्री फुले यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार प्रस्तावित होता. तो अद्याप मिळाला नाही. तो देण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सभागृहात केली.
यावेळी त्या म्हणाल्या की, २०१४ पूर्वी शाळेत शिकत असताना ‘सागरा प्राण तळमळला’ ही कविता उत्साहाने म्हणत होतो, मात्र आज महापुरुषांचे होणारे अपमान बघून मागील ८ वर्षातील केंद्र सरकार जबाबदार आहे का, याचा विचार व्हावा. मागील ६ महिन्यात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अतिशय बिघडलेली आहे.