अमरावती : काँग्रेसच्‍या आमदार सुलभा खोडके या राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्‍याची चर्चा आता सुरू झाली आहे. उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अमरावती विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अमरावती अजित पवार यांच्या स्वागताचे मोठे फलक लावून सुलभा खोडके यांनी यासंदर्भातील संकेत दिल्‍याची चर्चा जास्तच रंगली आहे. मात्र, पक्षप्रवेशाविषयी भाष्‍य करणे, सुलभा खोडके यांनी तूर्तास टाळले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरू आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी अशा सर्वच पक्षांतील वरिष्ठ नेते जागा वाटपाबाबत चर्चा करीत आहेत. त्यामुळे कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटणार याबाबत सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे. त्यातच आपापल्या मतदारसंघातील सध्याची परिस्थिती आणि राज्यातील राजकारण याचा विचार करत, अनेक इच्छुक उमेदवार पक्षांतर करताना दिसत आहेत. त्यातच आता अमरावती विधानसभा मतदारसंघातील विद्यमान काँग्रेस आमदार अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुलभा खोडके या काँग्रेसच्‍या उमेदवारीवर निवडून आल्‍या, पण, त्‍यापूर्वी त्‍यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली होती. बडनेरा मतदारसंघातून त्‍यांनी प्रतिनिधित्‍व देखील केले होते, पण २०१९ च्‍या निवडणुकीत त्‍यांनी पक्ष तसेच मतदारसंघही बदलला आणि त्‍यांना विजय मिळाला. सुलभा खोडके यांचे पती हे अजित पवार यांचे ते निकटचे मानले जातात. जिल्‍ह्याच्‍या राजकारणात त्‍यांचे स्‍वतंत्र अस्तित्‍व आहे. दुसरीकडे, सुलभा खोडके यांना जिल्‍ह्याच्‍या काँग्रेसच्‍या राजकारणात डावलले जात असल्‍याची तक्रार सुलभा खोडके यांनी अनेकवेळा केली होती. त्‍यांना स्‍थानिक कार्यक्रमांमध्‍ये निमंत्रित केले जात नव्‍हते, असे त्‍यांचे म्‍हणणे होते. आता बदललेल्‍या राजकीय परिस्थितीत त्‍या कोणती भूमिका घेतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Nana Patole gave a reaction about becoming Chief Minister
नाना पटोले म्हणतात, “मी मुख्यमंत्री व्हावे…”
26th September Rashi Bhavishya & Panchang
२६ सप्टेंबर पंचांग: दिवसाच्या सुरुवातीला ‘या’ राशींना होणार…
uttar pradesh bypoll
UP Bypoll 2024 : समाजवादी पक्षाकडून काँग्रेसला दोन जागांचा प्रस्ताव; काँग्रेस पाचवर ठाम; जागावाटपावरून दोन्ही पक्षांत मतभेद?
Nana Patole, Rahul Gandhi, Nana Patole on BJP,
राहुल गांधींना जीवे मारण्याचा भाजपाचा मानस – नाना पटोले
ulta chashma, president appointment
उलटा चष्मा : अध्यक्ष नेमणे आहे
ashok Chavan and congress leader d p sawant
अशोक चव्हाण- डी. पी. सावंत प्रथमच ‘आमने-सामने’
Congress stays away from power can there be happiness in country
चंद्रपूर: काँग्रेस मायावी रावण, सावध रहा…..भाजप नेत्याच्या वक्तव्याने……
Vijay Wadettiwar, Congress, Vijay Wadettiwar news,
वडेट्टीवारांना घेरण्याचे काँग्रेसमधूनच प्रयत्न सुरू

हेही वाचा – Katol Assembly Constituency : विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख बालेकिल्ला राखणार का?

हेही वाचा – भंडारा : दांडेगाव जंगल शिवारात अज्ञात महिलेचा सांगाडा; विविध तर्क वितर्कांना उधाण

पुढील आठवड्यात कळेल….

अमरावती विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍या माध्‍यमातून मोठा निधी उपलब्‍ध झाला. या विकास कामांचा शुभारंभ त्‍यांच्‍या हस्‍ते व्‍हावा, या उद्देशाने गुरुवारी शासकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते. यात राजकीय बाबी कुठल्‍याही नव्‍हत्‍या. भविष्‍यात ज्‍या राजकीय घडामोडी होतील, त्‍या पुढल्‍या आठवड्यात माहीत होतील, अशी प्रतिक्रिया सुलभा खोडके यांनी दिली.