नागपूर : मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवन परिसरात ‘महायुतीची महागुंडशा’ही असे फलक घेत निदर्शने केले.
महाविकास आघाडीच्या आमदारांनी ‘भक्त गुंडा पार्टी’ असे फलक घेऊन आंदोलन करत ‘तब लढे तो गोरोसे, अब लडेंगे भाजपके गुंडोसे’, ‘भाजप गुंडांचा पक्ष, फोडाफोडी हेच लक्ष्य’ अशा घोषणा यावेळी दिल्या.
हेही वाचा – शहांच्या समर्थनार्थ आता भाजप मैदानात, काँग्रेसचे विरोधात…
हेही वाचा – अमरावती : वाहनाच्या धडकेत पुन्हा एका बिबट्याचा बळी
u
आंदोलनामध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, अनिल चौधरी, भाई जगताप, रोहित पवार, अमीन पटेल, डॉ. प्रज्ञा सातव, विकास ठाकरे, नितीन राऊत आदींचा सहभाग होता. भाई जगताप म्हणाले, ‘काँग्रेसच्या कार्यालयाशेजारीच पोलीस आयुक्त कार्यालय तसेच मुंबई उच्च न्यायालय आहे. तरीदेखील तिथे शेकडो गुंड कसे पोहोचले कसे, हा प्रश्न आहे. हे गुप्तचर विभागाचे अपयश आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो, असे विरोधक म्हणाले.