वर्धा : २८ डिसेंबर रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय संमेलन नागपूरला होत आहे. हम तय्यार है, या नावाने होत असलेल्या या संमेलनाच्या तयारीसाठी राष्ट्रीय सचिवांना नेमण्यात आले आहे. लगतच्या जिल्ह्यातून अधिकाधिक लोक यावेत म्हणून पूर्वतयारीसाठी आढावा बैठका घेतल्या जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

 रॅलीचे प्रभारी सचिव बी.एम.संदीप  तसेच जिल्हा प्रभारी झिया पटेल यांनी घेतलेल्या सभेत गर्दी  जमा करण्याची बाब खर्चिक असल्याचे सर्वांनी स्पष्ट केले. त्यासाठी गाड्या हव्यात. कार्यकर्त्यांचे भोजन, नाश्ता हा खर्च आहेच. तो आणणार कुठून, असा सर्वांचा सवाल राहला. त्यावर काही काळ शांतताच पसरली. मार्ग काढायचा कसा, असा पेच पडताच काहींनी उत्तर शोधले. स्थानिक नेते विधानसभा निहाय काही खर्च करतील. तर खर्चाचा काही भार वरिष्ठांनी उचलावा. आताच प्रदेश समितीच्या दोन यात्रा झाल्या. त्याचा खर्च होत नाही तोच हे संमेलन आले. कसे झेपणार, असा प्रश्न केला गेला. तेव्हा उपस्थित प्रभारी नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर बोलावे लागणार असल्याचे सांगून सभा आटोपती घेतली. आमदार रणजीत कांबळे, माजी आमदार अमर काळे, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, प्रदेश समितीचे बंडोपंत टेंभुर्ण, शैलेश अग्रवाल, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, महिला काँग्रेसच्या हेमलता मेघे प्रामुख्याने उपस्थित होते.