चंद्रपूर :काँग्रेसने दलित उमेदवार प्रवीण पडवेकर यांना वाऱ्यावर सोडल्याने त्याचा थेट परिणाम काँग्रेसच्या जिल्ह्यातील सहाही जागांवर होण्याची शक्यता आहे. दलित मतदारांनी काँग्रेसचा “हाथ” सोडल्यास अडचणी वाढणार आहेत. अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर मतदार संघात काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांनी दलित उमेदवार प्रवीण पडवेकर याला वाऱ्यावर सोडले आहे. काँग्रेसचे बहुसंख्य पदाधिकारी प्रचारात सहभागी न होता घरी बसून आहेत.

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, खासदार मुकुल वासनिक, काँग्रेस महामंत्री के. सी. वेणुगोपाल, प्रभारी चौधरी, रेड्डी, ओझा यांनी चंद्रपुरात येऊन पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेतल्या. मात्र दलित उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्या एवजी पदाधिकारी घरात बसून मजा बघत आहेत. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात दोन जाहीर सभा घेतल्या. तसेच पदाधिकारी यांची हॉटेल एन.डी. मध्ये बैठक घेऊन प्रचारात उतरण्याचे निर्देश दिले. दरम्यान दलित मतदार हा सर्व प्रकार शांतपणे बघत आहे. मतदानाच्या दिवशी या सर्व घटनाक्रमाचा परिणाम काँग्रेसच्या सहाही जागांवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चंद्रपूर मतदार संघासोबत जिल्ह्यात दलित मतदारांची संख्या मोठी आहे. चंद्रपूर पाठोपाठ बल्लारपूर, ब्रम्हपुरी, वरोरा येथे दलीत समाज संख्येने अधिक आहे.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
evm scam india alliance
ईव्हीएमचा वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! ‘इंडिया’आघाडी याचिका दाखल करण्याची शक्यता
impeachment motion against justice Shekhar Yadav
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोगाची शक्यता; महाभियोग म्हणजे काय? आजवर किती न्यायाधीशांवर झाली कारवाई?
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले

हेही वाचा…शिवराजसिंह चौहान म्हणतात राहुल गांधींकड विकासाचे कुठलेही व्हीजन नाही

त्यामुळे चंद्रपुरात जर दलित उमेदवाराच्या पाठीशी काँग्रेस नेते उंभे राहिले नाही तर दलित मतदार सहाही मतदार संघात काँग्रेसचा “हात” सोडण्याची शक्यता आहे. राजुरा मतदार संघात स्वतः काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर ब्रम्हपुरीत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आहेत. वरोरा मधून काँग्रेसची लाडकी बहिण प्रतिभा धानोरकर यांचे लाडके भाऊ प्रवीण काकडे निवडणूक लढवित आहेत. चिमूर मधून डॉ. सतीश वारजुरकर व बल्लारपूर मध्ये संतोष सिंह रावत आहेत. दलित मतदारांचा या सर्व जागांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा मोठा आंबेडकरी समाज या सर्व मतदार संघात आहे. आज हा मुद्रा शांततेने कानोसा घेत आहेत. काँग्रेसच्या दिल्ली व महाराष्ट्रातील नेत्यांनी वारंवार निर्देश दिल्यानंतर देखील काँग्रेस पदाधिकारी उमेदवाराच्या पाठीशी उभे राहत नाही ही बाब देखील खटकणारी आहे. सामान्य कुटुंबातून येणारे प्रवीण पडवेकर आर्थिक दृष्ट्या कमजोर आहेत. अर्थकारणाच्या राजकारणात सर्वच पदाधिकारी पैशाची अपेक्षा लावून बसले आहेत. त्यामुळेही पदाधिकारी घरातून बाहेर पडत नसल्याची चर्चा आहे.

पटोलेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

चंद्रपूर मतदार संघात उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून हा प्रकार सुरू आहे. मात्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी पदाधिकाऱ्यांना ठणकावण्या ऐवजी त्यांनीही याची साधी दखल घेतली नाही. चंद्रपुरात ते फिरकले नाही. ब्रम्हपुरी, चिमूर येथे आले पण चंद्रपुरात येण्याचे टाळले.

Story img Loader