अकोला : वाशीम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघात काँग्रेसने विद्यमान आमदार अमित झनक यांना सलग चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरवले आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव जाहीर करण्यात आले. रिसोड मतदारसंघात झनक आणि देशमुख कुटुंबामध्ये पारंपरिक लढत होते. अनंतराव देशमुख यांचे पूत्र ॲड. नकुल भाजपकडून इच्छूक असल्याने यावेळेस देखील पारंपरिक लढतीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने गुरुवारी रात्री आपली पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये रिसोड मतदारसंघातून काँग्रेसने अमित झनक यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत उमेदवारी जाहीर केली. वाशीम जिल्ह्यातील राजकारणावर झनक कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. ॲड. रामराव झनक यांनी काँग्रेसकडून चारवेळा विधानसभेत वाशीम आणि मेडशी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांचे पूत्र आमदार सुभाष झनक यांनीही चार वेळा काँग्रेसकडून विधानसभा गाठली. आता झनक कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय आहे. २८ ऑक्टोबर २०१३ रोजी दिवंगत आमदार सुभाष झनक यांचे अकाली निधन झाल्यामुळे पोटनिवडणुकीत काँग्रेसने त्यांचे पूत्र अमित झनक यांना मैदानात उतरवले. २०१३ ची पोटनिवणूक, २०१४ व २०१९ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणूक असे सलग तीन विजय मिळवत अमित झनक यांनी हॅट्‌ट्रिक साधली आहे. आता चौथ्यांदा काँग्रेसने त्यांना संधी दिली.

Malegaon Central Assembly Constituency, Mahayuti Candidate, Maha Vikas Aghadi
Malegaon Assembly Constituency : मालेगावात उमेदवारच नसल्याने महायुतीची निवडणुकीपूर्वी हार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Maharashtra assembly election 2024 BJP releases third list of 25 candidates
BJP 3rd Candidate List: भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; ३ विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं!
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
DGP rashmi shukla visited RSS headquarters at Nagpur, nana patole complaint to election commission of india
Breaking: पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची निवडणूक आयोगाकडून बदली; मतदान १५ दिवसांवर असताना मोठी घडामोड!

हेही वाचा…विजयी भव! मिसेस गडकरींचा कोणाला आशीर्वाद?

u

माजी राज्यमंत्री तथा माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रिसोड मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवत अमित झनक यांना कडवी झुंज दिली होती. अमित झनक यांनी दोन हजार १४१ मतांनी अनंतराव देशमुखांचा पराभव केला. त्यानंतर अनंतराव देशमुख १४ मार्च २०२३ रोजी आपल्या पुत्रांसह भाजपवासी झाले. आता त्यांचे पूत्र ॲड.नकुल देशमुख यांचे रिसोड मतदारसंघातून भाजपकडून लढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपने त्यांना उमेदवारी दिल्यास रिसोडमध्ये पुन्हा एकदा झनक व देशमुख कुटुंबामध्ये चुरशीचा सामना होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा…उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचे नागपुरात शक्तीप्रदर्शन; मविआला लक्ष्य करत म्हणाले, “लाडक्या बहिणी विरोधकांना…”

महायुतीकडून कोण?

२०१९ मध्ये युतीमध्ये रिसोड मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला होता. त्यामुळे आता सुद्धा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाने रिसोडवर दावा केला आहे. हा मतदारसंघ शिवसेनेने लढावा यासाठी आमदार भावना गवळी आग्रही आहेत. दुसरीकडे भाजपकडून उमेदवारी मिळेल, या आशेवर अनंतराव देशमुख आपल्या पुत्रांसह भाजपमध्ये गेले. त्यामुळे महायुतीत रिसोड मतदार कुणाच्या वाट्याला येणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Story img Loader