बुलढाणा : नाशिक येथील काळाराम मंदिरातील वादग्रस्त  वेदोक्त प्रकरणाचा काँग्रेसने अभिनव पद्धतीने निषेध करून रामचंद्राला साकडे घातले. स्थानिक गर्दे वाचनालय परिसरात सोमवारी संध्याकाळी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभिनव आंदोलन करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Video : नागपूर : धावत्या शिवशाही बसला आग, चालकाच्या प्रसंगावधानाने प्रवाशांचा जीव वाचला

यावेळी श्रीरामाच्या महाकाय पुतळ्याला तिरंगा आणि हार अर्पण करून सपकाळ यांनी हातात भारतीय संविधान दिले. यावेळी माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, नाशकातील हा प्रकार धक्कादायक म्हणावा असाच आहे. छत्रपतींच्या घराण्यातील व्यक्तीला वेदोक्त व पुराणोक्तमध्ये अडकवणे अयोग्यच आहे. हा देश संविधानावर चालतो. त्या संविधानात राम, सीता, लक्ष्मण, गौतम बुद्ध आहेत. याची जाणीव करून देण्यासाठी व घटनेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. देशाचा कारभार मनुस्मृतीवर न चालता संविधानावर चालावा, असे साकडे प्रभुचरणी घातल्याचे सपकाळ यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress protested in an innovative way over kalaram temple incident scm 61 zws